UAE कडून मोदींना अनोख्या शुभेच्छा

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याने संयुक्त अरब अमीरात (UAE) ने मोदींना हटके पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. जेव्हा नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवन येथे पद आणि गोपनियतेची शपथ घेत होते, तेव्हा अबू धाबीमध्ये त्याचवेळी एका उंच इमारतीवर त्यांचा फोटो एलईडीमार्फत लावण्यात आला होता. अबू धाबी नॅशनल ऑईल कंपनीच्या (ADNOC) टॉवरवर भारत आणि UAE देशाचा …

UAE कडून मोदींना अनोख्या शुभेच्छा

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याने संयुक्त अरब अमीरात (UAE) ने मोदींना हटके पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. जेव्हा नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवन येथे पद आणि गोपनियतेची शपथ घेत होते, तेव्हा अबू धाबीमध्ये त्याचवेळी एका उंच इमारतीवर त्यांचा फोटो एलईडीमार्फत लावण्यात आला होता.

अबू धाबी नॅशनल ऑईल कंपनीच्या (ADNOC) टॉवरवर भारत आणि UAE देशाचा राष्ट्रध्वज प्रदर्शित करण्यात आला. तसेच UAE चे युवराज शेख मोहम्मद बिन जायद अल नहयान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओही लावला जात होता. UAE मधील हा व्हिडीओ भारताच्या राजदुतांनी शेअर केला आहे.

भारत आणि UAE मध्ये उर्जा क्षेत्रात सर्वात मोठी गुंतवणूक केली आहे. ADNOC ही एकटी अशी कंपनी आहे तिने भारताच्या पेट्रोलियम रिजर्व्ह प्रोग्राममध्ये गुंतवणूक केले आहे. या कंपनीने महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कॉम्पलेक्समधील प्रोजेक्टमध्येही भागीदारी केली आहे.

नेरंद्र मोदींनी सलग दुसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मोदी पहिल्यांदा 2014 रोजी देशाचे पंतप्रधान झाले होते.

पंतप्रधान म्हणून आपला एक कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी हे तीसरे पंतप्रधान आहेत. यापूर्वी एक कार्यकाल पूर्ण झाल्यावर दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरु आणि डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधान झाले आहेत.

पंतप्रधानांसोबत 57 खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये 24 कॅबिनेट मंत्री, 9 राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि 24 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *