किरकोळ वादातून 23 वर्षीय मुलाकडून आईची गळा दाबून हत्या

अहमदनगर : किरकोळ वादातून मुलाने जन्मदात्या आईची गळा दाबून हत्या केली. अहमदनगर शहरातील कल्याण रोड परिसरात रविवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 23 वर्षीय सागर बाळू गुंजाळ असे आरोपीचे नाव आहे. गुंजाळ कुटुंब काही वर्षांपासून शिवाजीनगर भागात राहतात. घरात आई आणि मुलगा यांच्यामध्ये वारंवार किरकोळ कारणातून वाद होत असत. …

किरकोळ वादातून 23 वर्षीय मुलाकडून आईची गळा दाबून हत्या

अहमदनगर : किरकोळ वादातून मुलाने जन्मदात्या आईची गळा दाबून हत्या केली. अहमदनगर शहरातील कल्याण रोड परिसरात रविवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 23 वर्षीय सागर बाळू गुंजाळ असे आरोपीचे नाव आहे.

गुंजाळ कुटुंब काही वर्षांपासून शिवाजीनगर भागात राहतात. घरात आई आणि मुलगा यांच्यामध्ये वारंवार किरकोळ कारणातून वाद होत असत. अनेकवेळा आजूबाजूच्या रहिवाशांनी या दोघांमधील वाद सोडवले होते. मात्र काल रात्रीही दोघांमध्ये वाद झाला. यात सागरने आईची गळा दाबून हत्या केली. आज सकाळी सागरची बहीण घरी आल्यानंतर हत्येची घटना उघडकीस आली. तिने तत्काळ तोफखाना पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी सागरला अटक केली.

हत्येच्या दुसऱ्या दिवशी, आईचा मृत्यू नैसर्गिक भासवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये गळा आवळून मृत्यू झाल्याचे स्पष्ट केल्यानंतर पोलिसांनी तपास करत मुलाला अटक केली.

नेमकं काय घडलं?

शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत मुलगी आईजवळ होती. त्यानंतर ती आपल्या घरी आली. शनिवारी सकाळी मुलगी पुन्हा आईकडे गेली. आईला आवाज देऊन आतून दरवाजा उघडण्यास सांगितले. मात्र आतून कोणताच प्रतिसाद नसल्याने लहान मुलीच्या मदतीने दरवाजा उघडून आत गेल्यावर, आई झोपलेल्या अवस्थेत दिसली. त्यामुळे मुलीने आरडाओरड केल्यानंतर तिचा भाऊ सागर गुंजाळ पाठीमागे झोपलेल्या खोलीतून उठून आईच्या खोलीत आला. सागर आणि त्याच्या बहिणीने आईला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे डॉक्टरांनी आईला मृत घोषित केले.

मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येऊन तोफखाना पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शनिवारी दुपारी महिलेवर अंत्यसंस्कार केले. तोपर्यंत महिलेचा झोपेत नैसर्गिक मृत्यू झाल्याचे सांगितले. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी महिलेचा मृत्यू गळा दाबून झाल्याचा अभिप्राय दिल्यानंतर पोलिसांनी मृत्यूबाबत चौकशी सुरु केली आणि मुलाने म्हणजेच सागरनेच आईची गळा आवळून हत्या केल्याचे उघड झाले.

दरम्यान, आरोपी सागर गुंजाळ हा दहावीपर्यंत शिकलेला होता. नगरमधील गणेश मूर्ती, देवीच्या मूर्ती बनविणाऱ्या कारखान्यात तो काम करत होते. त्याला दारुचे व्यसन होते. त्यातून आई व मुलामध्ये सातत्याने भांडण होत असत. मात्र, पोटच्या मुलाने आईची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *