आईने मुलाला रुग्णालयात सोडले, डॉक्टरांनी मंदिराबाहेर फेकले, नवजात बालकाचा मृत्यू

आंध्रप्रदेशात एका नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. माचिलीपटनम येथील एका खासगी रुग्णालयात जन्मलेल्या नवजात बालकाला त्याच्या आईने रुग्णालयात (Mother leaves baby boy in hospital) सोडले आणि तेथूप पळ काढला.

आईने मुलाला रुग्णालयात सोडले, डॉक्टरांनी मंदिराबाहेर फेकले, नवजात बालकाचा मृत्यू
Follow us
| Updated on: Oct 06, 2019 | 2:52 PM

हैदराबाद : आंध्रप्रदेशात एका नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. माचिलीपटनम येथील एका खासगी रुग्णालयात जन्मलेल्या नवजात बालकाला त्याच्या आईने रुग्णालयात (Mother leaves baby boy in hospital) सोडले आणि तेथून पळ काढला. त्यानंतर डॉक्टरांनीही या नवजात बालकाला मंदिराबाहेर सोडले. त्यामुळे या बालकाचा मृत्यू (Mother leaves baby boy in hospital) झाला. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात रुग्णालयाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.

मंदिराबाहेर मुलगा रडत असल्याचे पाहून स्थानिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तातडीने या बालकाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिल्हा रुग्णालयाने 2 ऑक्टोबर रोजी नवजात बालकाला विजयवाडाच्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. मात्र विजयवाडाच्या रुग्णालयात बालकाचा मृत्यू झाला, असं पोलिसांनी सांगीतले.

नवजात बालकाला त्याच्या आईने माचिलीपटनम येथील एका रुग्णालयात सोडले होते. त्यादिवशी डॉ. धनवंतरी श्रीनीवासाचार्य आणि एएनएम बेबी राणी यांच्या नेत्रृत्वात रुग्णालयाच्या कर्माचाऱ्यांनी नवजात बालकाला मंदिराबाहेर सोडले, असं पोलिसांनी सांगितले.

जन्म देणारी महिला अविवाहीत होती. त्यामुळे तिने या मुलाला रुग्णालयात सोडले आणि तेथून फरार झाली. या प्रकरणात एका डॉक्टराला आणि त्याच्या सहकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच फरार असलेल्या महिलेचाही पोलीस शोध घेत आहेत.

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.