Corona : मुंबई लोकल प्रवासावर निर्बंध, केवळ अत्यावश्यक प्रवास करता येणार

आज सकाळी 6 वाजेपासून ते 31 मार्चपर्यंत मुंबईची रक्तवाहिनी समजली जाणारी मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली आहे

Corona : मुंबई लोकल प्रवासावर निर्बंध, केवळ अत्यावश्यक प्रवास करता येणार
Follow us
| Updated on: Mar 22, 2020 | 9:50 AM

मुंबई : सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने (Mumbai Local Train Services Closed) थैमान घातला आहे. भारतातही हा विषाणूने आपले पाय पसरवण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, केंद्र आणि राज्य सरकार या विषाणूशी लढा देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा आजपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजेपासून ते 31 मार्चपर्यंत मुंबईची रक्तवाहिनी समजली जाणारी मुंबई (Mumbai Local Train Services Closed) लोकल सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि वैद्यकीय इमर्जन्सी असल्याशिवाय लोकल प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी हे निर्देश जारी केले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी कमी करणे हे सर्वात मोठं शस्त्र आहे. त्या पार्श्वभूमीवर आता लोकल प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्व लोकल स्थानकांवर विशेष पथक तैनात करण्यात आले आहेत. ही पथकं आयकार्ड पाहून लोकल (Mumbai Local Train Services Closed) स्थानकांवर प्रवेशासाठी देणार परवानगी दोणार, अन्यथा प्रवास करण्यास बंदी असेल. प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम मुख्य प्रवेश द्वारावर या पथकांची नियुक्ती करण्यात येईल, असंही आयुक्त शिवाजी दौंड यांनी सांगितलं.

पथकामध्ये कोण असणार?

रेल्वे पोलीस -1 राज्य पोलीस – 1 महसूल विभागाचा – 1 प्रतिनिधी वैद्यकीय कर्मचारी – 1

आज जनता कर्फ्यू

कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता देशात आज सकाळी सात वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM narendra modi) देशातील नागरिकांना एक दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं आहे. जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभर अन्नधान्य, दूध, औषधे यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं आणि कार्यालयांना (Mumbai Local Train Services Closed) टाळं असणार आहे.

संबंधित बातम्या :

कोरोनामुळे जगात पहिल्यांदाच घडत आहेत ‘या’ दहा गोष्टी

जगभरात कोरोनाचं थैमान, चीन, इटलीनंतर स्पेन आणि इराणमध्येही हाहाकार, कोणत्या देशात किती मृत्यू?

Janta Curfew : जनता कर्फ्यू; कोरोना विरुद्ध आज सर्वात मोठी लढाई

औरंगाबादची कोरोनावर मात, बाधित महिला सात दिवसानंतर ठणठणीत

Non Stop LIVE Update
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.