नववर्ष स्वागतासाठी मुंबईकर सज्ज, ड्रग्ज आणि रेव्ह पार्टीवर पोलिसांची करडी नजर

यंदाही अनेक ठिकाणी ड्रग्ज पार्टीची तयारी सुरू असल्याचा म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे ड्रग्ज किंवा रेव्ह पार्टी होऊ नये म्हणून सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली (Mumbai police on Drugs Party) आहे.

नववर्ष स्वागतासाठी मुंबईकर सज्ज, ड्रग्ज आणि रेव्ह पार्टीवर पोलिसांची करडी नजर
Follow us
| Updated on: Dec 24, 2019 | 11:49 PM

मुंबई : नववर्षाचा स्वागत म्हटलं की पार्टी, हंगामा आणि जल्लोष… मात्र अनेकदा पार्टीच्या नावाखाली नववर्षात मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणि रेव्ह पार्ट्यांचा आयोजन केलं (Mumbai police on Drugs Party)  जातं. यंदाही अनेक ठिकाणी ड्रग्ज पार्टीची तयारी सुरू असल्याचा म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे ड्रग्ज किंवा रेव्ह पार्टी होऊ नये म्हणून सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली (Mumbai police on Drugs Party) आहे.

यंदाच्या वर्षात ड्रग्ज किंवा रेव्ह पार्टीसंदर्भात मुंबई पोलिसांनी 11 हजार 572 गुन्हे दाखल केले आहेत. या सर्व कारवाई ड्रग्ज पार्टीबाबत आहेत. यात एकूण 11 हजार 986 लोकांना अटक केलीा आहे. तर या पार्टीत 714 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. याची किंमत साधारण 62 कोटी रुपये आहे. याबाबत काही तक्रारी असतील तर 9819111222 यावर तक्रार करा असे सांगण्यात आलं आहे.

तर 2019 मध्ये अमली पदार्थ विरोधी पथकाने 70 गुन्हे दाखल केले आहेत. यात 103 जणांना अटक केली असून यात 394 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. याची किंमत 25 कोटी रुपये आहे.

मुंबई हे ड्रॅग रॅकेटचा प्रमुख हब आहे. या ठिकाणी ड्रग माफियांचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले आहेत. ड्रग्ज अफगाणिस्तानसारख्या इतर अनेक देशातून भारतात आणली जातात. भारतात आणल्यानंतर हे ड्रग्ज काश्मीरपासून दिल्ली आणि नंतर मुंबईमध्ये आणली जाते. या ड्रग्जची वाहतूक रोडमार्गे, हवाईमार्गे आणि प्रामुख्याने रेल्वेमार्फत केली जाते. पण यंदा थर्टीफर्स्ट आणि नववर्षवर ड्रग माफियांवर करडी नजर रेल्वे पोलीस ठेवणार (Mumbai police on Drugs Party) आहेत.

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ड्रग विक्रीचे रॅकेट आहेत. त्याचबरोबर थर्टी फर्स्ट किंवा नववर्षाला ड्रग्ज किंवा रेव्ह पार्ट्यांचा आयोजन मुंबईच्या अनेक थ्री स्टार , फाईव्ह स्टार पब, हॉटेलात केलं जाते. तर ठाणे जिल्ह्यात येयूर, लोणावळासारख्या भागात ही अशा पार्ट्या मोठ्या प्रमाणावर होतात हे उघडकीस आला आहे. म्हणूनच यंदा मुंबई पोलिसांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. थर्टी फर्स्टच्या दिवशी नार्कोटिक्स सेल, क्राईम ब्रांचसोबत पोलीस अधिकारी कर्मचारी हे साध्या वेशात ड्रग्ज आणि रेव्ह पार्ट्यांवर लक्ष ठेऊन (Mumbai police on Drugs Party) असणार आहेत.

दरम्यान हे ड्रग पेड़लर किंवा मॅन्युफेक्चर नेट बॅकिंगच्या माध्यमाने मोठ्या प्रमाणावर पैशांचे ट्रान्झेक्शन कश्मीरला करतात. मात्र जरी हे ड्रग्ज मॅन्युफेक्चरर किंवा पेडलर काही प्रमाणात आनलाईन ट्रान्झेक्शन करत असले. तरी ड्रग्जचा वापर करणाऱ्यांकडे चलन संकट असल्यामुळे यंदा ड्रग्ज किंवा रेव्ह पार्ट्यांच्या धंदा मंदीत असल्याचा तज्ज्ञाचं मत आहे .

थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या निम्मिताने ड्रग्ज पार्टी होणार हे नक्की आहे. काश्मीर ते मुंबईपर्यंत चालणारा हा ड्रॅग रॅकेटमध्ये कोटींची उलाढाल होते. त्यात मॅन्युफेक्चर, कॅरियर, एजेंट किंवा इतर लोकांची एक मोठी चैन असते. स्थानिक आणि शासकीय यंत्रणाचा ही या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा शक्यता नाकारता येत नाही. मात्र तरुण पिढीला ड्रग्ज आणि रेव्ह पार्टीपासून वाचवण्यासाठी त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे (Mumbai police on Drugs Party) सज्ज आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.