Lockdown 4 | मोदींकडून लॉकडाऊन 4 ची घोषणा, ठाकरे सरकारकडून रणनीती आखण्यास सुरुवात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली महाविकास आघाडीची (MVB leaders meeting for planning of lockdown four) बैठक संपली. यावेळी लॉकडाऊन 4 बाबत चर्चा झाली.

Lockdown 4 | मोदींकडून लॉकडाऊन 4 ची घोषणा, ठाकरे सरकारकडून रणनीती आखण्यास सुरुवात
Follow us
| Updated on: May 14, 2020 | 2:26 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली महाविकास आघाडीची (MVB leaders meeting for planning of lockdown four) बैठक संपली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. लॉकडाऊन आणि अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर कसा आणता येईल याबाबतची चर्चा या बैठकीत झाला. या बैठकीला महाविकास आघाडीच्या नेत्यांसह मुख्य सचिव अजॉय मेहता आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह उपस्थित होते. (MVB leaders meeting for planning of lockdown four)

या बैठकीत झोननुसार कुठल्या गोष्टी सुरु करता येतील यावर चर्चा झाली. अर्थव्यवस्थेसंदर्भात अभ्यास करण्यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली होती, त्या समितीच्या अहवालावर मंथन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्याबाबतचे नियम 18 मेपूर्वी जाहीर करु, असं त्यांनी सांगितलं आहे. त्या पार्श्वभूमीवरही महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

देशातील तिसऱ्या लॉकडाऊनची मुदत 17 मे रोजी संपणार आहे. मात्र त्यापुढील म्हणजे चौथ्या लॉकडाऊनची रणनीती कशी असेल, कुठे शिथीलता द्यायची, उद्योगधंदे कसे सुरु करायचे, कुठे सुरु करायचे अशी सर्वव्यापी चर्चा या बैठकीत झाली.

मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत ही बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींकडून लॉकडाऊन 4 ची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा देशाला संबोधित केलं. (PM Narendra Modi address the nation) दोन दिवसापूर्वी केलेल्या संबोधनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन 4 ( Lockdown 4) ची घोषणा केली. लॉकडाऊन 4 हा नव्या नियमांसह असेल, त्याचे नियम 18 मे पूर्वी जाहीर करु असं मोदींनी सांगितलं. सध्या चालू असलेला लॉकडाऊन 3 हा 17 मे रोजी संपणार आहे. मात्र त्यापूर्वीच मोदींनी लॉकडाऊन 4 ची घोषणा केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी स्वावलंबी भारतचा नारा देऊन, स्वावलंबी भारत अभियानासाठी 20 लाख कोटीच्या पॅकेजची घोषणा केली.

संबंधित बातम्या 

Lockdown 4 : पंतप्रधान मोदींकडून ‘लॉकडाऊन 4’ ची घोषणा, 18 मे पूर्वी नियम जाहीर करणार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.