नागपूरवासियांना दिलासा, रविवारी एकही नवा कोरोनाग्रस्त नाही, 193 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

नागपूरमध्ये कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 50 वर पोहोचली आहे. 'कोरोना'वर मात करणाऱ्या रुग्णांचं प्रमाण इथे 33 टक्के झालं आहे. (Nagpur No Corona Patient Found in a day)

नागपूरवासियांना दिलासा, रविवारी एकही नवा कोरोनाग्रस्त नाही, 193 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
Follow us
| Updated on: May 04, 2020 | 10:41 AM

नागपूर : ‘कोरोना’चा विळखा दिवसेंदिवस वाढत असताना नागपूरवासियांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. कालच्या दिवसात (रविवार 3 मे) नागपुरात एकही नवा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. जिल्ह्यातील 193 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेनेही सुटकेचा निश्वास टाकला. (Nagpur No Corona Patient Found in a day)

नागपुरात कालचे सर्व 193 रिपोर्ट निगेटिव्ह आलेत. नागपूर शहरात आतापर्यंत 151 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. काल चार रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 50 वर पोहोचली आहे. ‘कोरोना’वर मात करणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 33 टक्के झालं आहे.

नागपुरात कोरोनाची लागण झालेल्या पहिल्या गर्भवती महिलेची सुरक्षित प्रसुती झाली. सतरंजीपुरा परिसरातील 29 वर्षीय महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. मेडिकल भागामधील कोवीड हॉस्पिटलमध्ये महिलेची प्रसुती झाली. महिलेचा दुसरा आणि तिसरा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. 48 तासांनंतर नवजात बाळाचे नमुने तपासणार आहेत.

दरम्यान, राज्य सरकारने काल एक परिपत्रक काढून लॉकडाऊनमध्ये काही सूट देण्याचं जाहीर केलं. मात्र, नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूर शहरात कुठलीही सवलत मिळणार नाही. ज्याप्रकारे 3 मेपर्यंत निर्बंध होते, तसेच निर्बंध 17 मेपर्यंत राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला भाजपने आक्षेप घेतला आहे. दारुची दुकानं वगळता इतर दुकानं उघडायला काय हरकत आहे? राज्य सरकारने परवानगी दिल्यावरही आयुक्त टोकाची भूमिका घेत असल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी केला आहे.

सतरंजीपुरा या नागपुरातील ‘कोरोना’ हॉटस्पॉट असलेल्या भागातील नागरिकांना नियमबाह्य पद्धतीने क्वारंटाईन केल्याचा आरोप करत नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. सतरंजीपुरा भागातील मोहम्मद निशात मोहम्मद सलीम यांनी केली याचिका दाखल केली. नागपूर खंडपीठाने केंद्र सरकार, राज्य सरकार, नागपूर महापालिका आणि आयसीएममारला नोटीस पाठवली असून दोन दिवसात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

(Nagpur No Corona Patient Found in a day)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.