नागपुरात पोलिसाच्या पत्नीची हत्या, मुलाच्या मित्राचा चाकूहल्ला

नागपुरात गाढवे नगरात राहणाऱ्या 55 वर्षीय सुशीला मुळे यांची मुलाच्या मित्रानेच राहत्या घरी हत्या केल्याचा आरोप आहे. (Nagpur Police Wife Murder)

नागपुरात पोलिसाच्या पत्नीची हत्या, मुलाच्या मित्राचा चाकूहल्ला

नागपूर : नागपुरात पोलिसाच्या पत्नीची राहत्या घरीच निर्घृण हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुशीला मुळे यांच्या मुलाच्या मित्रानेच चाकूहल्ला करुन त्यांचा जीव घेतल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात सुशीला मुळे यांचा मुलगाही जखमी झाला आहे. (Nagpur Police Wife Murder)

नागपुरात नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गाढवे नगरात राहणाऱ्या 55 वर्षीय सुशीला मुळे यांची राहत्या घरी हत्या झाली. सुशीला यांचे पती नागपूर पोलिस दलात कार्यरत असून त्यांची नेमणूक गुन्हे शाखेत आहे. पोलिस कर्मचाऱ्याच्याच पत्नीची हत्या झाल्याने शहरात खळबळ माजली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी नवीन गोटाफोडे हा मयत सुशीला यांच्या मुलाला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी सुशीला यांनी त्यांच्या मुलाला भेटू दिले नाही. त्यामुळे आरोपी नवीन परत गेला. काल तो पुन्हा सुशीला यांच्या मुलाला भेटण्यासाठी आला, तेव्हा त्याने सुशीला यांच्यावर चाकूने हल्ला केला.

हेही वाचा : डोळ्यात काड्या खुपसल्या, डोक्यात विटेने हल्ला, जळगावात 16 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या

आरोपीच्या हल्ल्यात सुशीला यांचा मृत्यू झाला असून मुलगाही जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर नंदनवन पोलिसांनी आरोपी नवीनचा शोध सुरु केला आहे (Nagpur Police Wife Murder)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *