आता नांगरे पाटील अॅक्शन मोडमध्ये; विनाकारण फिरणाऱ्या गाड्या 3 महिन्यांसाठी जप्त

नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी नसताना बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्या गाड्या जप्त करण्याचे आदेस दिले आहेत (Vishwas Nangare Patil on LockDown aciton).

आता नांगरे पाटील अॅक्शन मोडमध्ये; विनाकारण फिरणाऱ्या गाड्या 3 महिन्यांसाठी जप्त

नाशिक : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. मात्र, यानंतरही अनेक ठिकाणी नागरिक नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत. नाशिकमध्ये देखील असे प्रकार पाहायला मिळाले. यानंतर नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी नसताना बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्या गाड्या जप्त करण्याचे आदेस दिले आहेत (Vishwas Nangare Patil on LockDown aciton). जमावबंदी आणि संचारबंदीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांच्या गाड्या तीन महिन्यांसाठी जप्त केल्या जाणार आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभागाने नागरिकांना ‘सोशल डिस्टंन्सिंग’ ठेवण्यास सांगितलं आहे. मात्र, काही नागरिक याकडे दुर्लक्ष करुन सर्रासपणे बाहेर फिरताना दिसत आहेत. त्यांच्यावर नियंत्रणासाठी या आपतकालीन स्थितीत विश्वास नांगरे पाटील यांनी थेट गाडी जप्तीचा जालीम उपाय शोधला आहे. यामुळे एकदा बाहेर फिरायला आलेल्या अतिशहाण्याची गाडी जप्त होणार आहे.

नाशिक प्रशासनकडून नागरिकांची लॉकडाऊनच्या काळात गैरसोय होऊ नये म्हणून काही उपाययोजनाही करण्यात येत आहे. नागरिकांच्या जेवणाची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील 100 हॉटेल्सला केवळ पार्सल सेवा सुरु करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कुटुंबासोबत नसलेल्या नागरिकांना संबंधित हॉटेल्सला ऑर्डर करुन आपलं जेवण मागवता येणार आहे.

संबंधित बातम्या :

विश्वास नांगरे पाटलांच्या गावाला नदीचा वेढा, नांगरे पाटील म्हणतात….

मुथूट दरोडाप्रकरणात नाशिक पोलिसांना मोठं यश, मुख्य आरोपीला सुरतमधून अटक

नाशिकमध्ये विश्वास नांगरे पाटलांना गुन्हेगारांचं थेट आव्हान?

नाशिकमध्येही हेल्मेटसक्ती लागू, विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय

Vishwas Nangare Patil on LockDown aciton

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *