पती बँकेत जाण्यासाठी उतरताच कार पळवली, दागिने लुटून महिलेची हत्या, नवी मुंबईत खळबळ

पत्नीला गाडीत बसवून पती बँकेत पैसे काढण्यासाठी गेला, मात्र बाहेर आल्यानंतर पत्नी आणि कार दोन्ही गायब झाल्याने तो हादरला. शोधाशोधीनंतर काही अंतरावरच कारमध्ये पत्नी रक्ताच्या थारोळ्यात आढळली

पती बँकेत जाण्यासाठी उतरताच कार पळवली, दागिने लुटून महिलेची हत्या, नवी मुंबईत खळबळ
Follow us
| Updated on: Mar 03, 2020 | 8:14 AM

नवी मुंबई : पती पैसे काढण्यासाठी बँकेत गेल्याची संधी साधून महिलेचे दागिने लुटत तिची कारमध्येच गोळी झाडून हत्या करण्यात आली. लुटारुंच्या टोळीने चोरीच्या उद्देशाने महिलेची हत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. नवी मुंबईत भरदिवसा घडलेल्या या हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Navi Mumbai Lady Loot and Murder)

नवी मुंबईतील न्हावा-शेवा भागातील शेलघर गावात राहणाऱ्या प्रभावती भगत आपले पती बाळकृष्ण भगत यांच्यासह लग्नाला निघाल्या होत्या. उलवे सेक्टर 19 परिसरात असलेल्या ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या शाखेतून भगत दाम्पत्याला पैसे काढायचे होते.

बँकेजवळ आल्यावर बाळकृष्ण यांनी स्विफ्ट कार सुरु ठेवली आणि पत्नीला गाडीत बसवून स्वतः बँकेत पैसे काढण्यासाठी गेले. काही वेळानंतर ते बँकेबाहेर आले असता कार आणि पत्नी दोन्ही नव्हते. हादरलेल्या बाळकृष्ण यांनी काही वेळ इकडे-तिकडे शोधाशोध सुरु केली.

घाबरलेल्या बाळकृष्ण यांनी आपल्या मुलाला फोन करुन घडलेला प्रकार सांगितला. त्यांचा मुलगा तातडीने उल्वे सेक्टर 19 मध्ये आपल्या काही मित्रांसोबत आला. काही वेळ शोधल्यानंतर मुलाला आपली आई प्रभावती आणि स्विफ्ट गाडी बँकेपासून 200 मीटरवर असलेल्या सेक्टर 23 मध्ये आढळली.

मुलाने गाडीजवळ जाऊन पाहिल्यानंतर प्रभावती कारच्या पुढच्या सीटवार रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत सापडल्या. गाडीची काचही फुटलेली होती. मुलाने लगेच आईला घेऊन बेलापूरमधील अपोलो हॉस्पिटल गाठलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी प्रभावती यांना मृत घोषित केलं.

प्रभावती भगत यांच्या छातीमध्ये गोळी झाडण्यात आली होती. ही माहिती मिळताच झोन दोन पोलिस आणि एनआरआय पोलिस आधी घटनास्थळी आणि नंतर अपोलो हॉस्पिटलला दाखल झाले.

भगत कुटुंब एका लग्नात सहभागी होण्यासाठी घरातून निघाले होते. हत्येच्या वेळी मयत प्रभावती यांनी दागिने घातले होते. अज्ञात लुटारुंच्या टोळीने दागिने चोरण्यासाठी बँकेबाहेर उभी असलेली कार पळवण्याचा प्रयत्न केला असेल. चोरांचा विरोध करत असताना प्रभावती यांची चोरांनी गोळी झाडून हत्या केली असेल, असा पोलिसांना संशय आहे.

अपोलो हॉस्पिटलमध्ये तपासणी करुन प्रभावती भगत यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी वाशी महापालिका रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मात्र भरदिवसा झालेल्या या हत्येमुळे परिसरात दहशत पसरली आहे. (Navi Mumbai Lady Loot and Murder)

हेही वाचा – ऑनलाईन पे करुनही मसाजसाठी तरुणी आली नाही, नागपूरच्या तरुणाची पोलिसात तक्रार

Non Stop LIVE Update
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.