झारखंडमध्ये नक्षली हल्ल्यात 25 जवान जखमी

रांची (झारखंड) : झारखंडच्या खरसावामध्ये नक्षली हल्ल्यात 25 जवान जखमी झाले आहेत. ही घटना आज (28 मे) सकाळी पहाटे 4.53 वाजता घडली. जखमी झालेल्या जवानांना रांची येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. काही जवान गंभीर जखमी असल्याचे सांगितलं जात आहे. सध्या खरसावा येथे चारही बाजूने जवानांनी घेराव घातला आहे. खरसावा येथे मोठ्या प्रमाणात नक्षलवादी …

, झारखंडमध्ये नक्षली हल्ल्यात 25 जवान जखमी

रांची (झारखंड) : झारखंडच्या खरसावामध्ये नक्षली हल्ल्यात 25 जवान जखमी झाले आहेत. ही घटना आज (28 मे) सकाळी पहाटे 4.53 वाजता घडली. जखमी झालेल्या जवानांना रांची येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. काही जवान गंभीर जखमी असल्याचे सांगितलं जात आहे. सध्या खरसावा येथे चारही बाजूने जवानांनी घेराव घातला आहे.

खरसावा येथे मोठ्या प्रमाणात नक्षलवादी एकत्र आल्याची माहिती जवानांना मिळाली होती. या माहितीनुसार जवानांनी खरसावा येथे सर्च ऑपरेशन सुरु केले होते. सर्च ऑपरेशन दरम्यान नक्षलवाद्यांकडून आयईडी बॉम्ब हल्ला करण्यात आला.

, झारखंडमध्ये नक्षली हल्ल्यात 25 जवान जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी 209 कोब्रा बटालियन आणि झारखंड पोलिसांवर मंगळवारी (28 मे) पाहाटे 4.53 वाजता आयईडी बॉम्ब हल्ला केला. या बॉम्ब हल्ल्यात कोबरा आणि झारखंड पोलिसांचे 25 जवान जखमी झाले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच म्हणजेच 1 मे रोजी महाराष्ट्रातील गडचिरोली येथे कुरखेडा तालुक्यात दादापूर मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला होता. या स्फोटात 15 जवान शहीद झाले होते. यावेळी पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाच्या दोन गाड्यांवर नक्षलवाद्यांनी लक्ष्य केलं होते. हा हल्ला गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा आणि लेंढारी गावादरम्यान झाला होता.

संबधित बातम्या :

 मोदींच्या दौऱ्याआधी दंतेवाड्यात नक्षलवाद्यांचा हैदोस

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी पुन्हा वाहने पेटवली

मित्रांकडून बर्थ डे पार्टीचं नियोजन, मात्र नक्षलींना घात केला, भंडाऱ्याचा जवान शहीद!

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *