मी जितेंद्र आव्हाड बोलतोय, मी बोलतो ते तुम्हाला पाळावंच लागेल, विनाकारण फिरणाऱ्याना आव्हाडांची ताकीद

प्रत्येकाने आपापल्या घरात राहून ही लढाई जिंकायची आहे, तसे झाल्यास यात हमखास यश मिळू शकेल, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. (Jitendra Awhad warns to stay home)

मी जितेंद्र आव्हाड बोलतोय, मी बोलतो ते तुम्हाला पाळावंच लागेल, विनाकारण फिरणाऱ्याना आव्हाडांची ताकीद

मुंबई : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून सतत नागरिकांना घरी बसण्याचं आणि काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कळवा-मुंब्रा परिसरात जाऊन रहिवाशांना घरी राहण्यास सांगितलं. जीवाशी खेळू नका, घराबाहेर पडाल, तर 14 दिवस तुरुंगात पाठवण्याची तरतूद केली आहे, अशी ताकीदच आव्हाड यांनी दिली. (Jitendra Awhad warns to stay home)

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे. मात्र यासाठी प्रत्येकाचे सहकार्य मिळणे आवश्यक असताना नागरिक अजूनही घराबाहेर फिरत आहेत. प्रत्येकाने आपापल्या घरात राहून ही लढाई जिंकायची आहे, तसे झाल्यास यात हमखास यश मिळू शकेल, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. कोरोनाबाबत ते जानकीनगरमधील रहिवाशांशी संवाद साधत होते.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

‘जर आपण त्याच्या वरती जाऊन घरातून बाहेर पडणार असाल, तर तुम्हाला 14 दिवसांसाठी जेलमध्ये टाकण्याची तरतूद करण्यात आली आहे. जानकीनगरमधल्या माझ्या बंधू भगिनींनो, मी तुमचा जितेंद्र आव्हाड बोलतोय. मी स्वतः जानकीनगरमध्ये आलो आहे, तुम्हाला समजवायला. याच्यापुढे जानकीनगर संपूर्ण सील करण्यात येईल आणि एकाही माणसाला घराच्या बाहेर पडू देणार नाही.’ असं आव्हाड म्हणाले. (Jitendra Awhad warns to stay home)

हेही वाचा : आत्ता लोकांचे जीव वाचवणं गरजेचं, तेलंगणा मुख्यमंत्र्यांची मोदींकडे लॉकडाऊन वाढवण्याची विनंती

‘आम्ही हौसेखातर करत नाही, तुमचा जीव वाचवण्यासाठी करतोय. हा प्रयत्न तुमचा जीव वाचवण्यासाठी आहे, तुम्हाला तुमचा जीव प्यारा नसेल तरी तो मला आहे. जानकीनगरमध्ये मी कोणालाही घराबाहेर पडू देणार नाही. पूर्ण पोलिसांची ताकद लावून तुम्हाला घरामध्ये बंद करण्यात येईल. जास्त शहाणपणा करु नका. आपल्या जीवाशी खेळू नका. लहान मुलं आहेत, घरी आई वडील आहेत, बायको आहे, या सगळ्यांचा संसार उद्ध्वस्त करायचा असेल तर बाहेर या. अन्यथा तुम्हाला घराबाहेर पडता येणार नाही. मी जितेंद्र आव्हाड बोलतोय. आणि मी जेव्हा बोलतो ते तुम्हाला पाळावंच लागेल, हे लक्षात ठेवा’ असं आव्हाड म्हणाले.

(Jitendra Awhad warns to stay home)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *