शरद पवारांवरील ईडीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादीच्या समर्थकांकडून 'बारामती बंद'ची हाक

भाजप सरकार सूडबुद्धीने शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बारामती बंदची हाक दिली आहे.

Baramati Bandh to support Sharad Pawar, शरद पवारांवरील ईडीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादीच्या समर्थकांकडून ‘बारामती बंद’ची हाक

बारामती : राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर पवार समर्थकांनी आज (बुधवार, 25 सप्टेंबर) ‘बारामती बंद’ची हाक (Baramati Bandh to support Sharad Pawar) दिली आहे. ईडीच्या कारवाई विरोधात बारामती शहरातील बाजारपेठा, दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहेत. बंदच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Baramati Bandh to support Sharad Pawar, शरद पवारांवरील ईडीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादीच्या समर्थकांकडून ‘बारामती बंद’ची हाक

शरद पवारांची पत्रकार परिषद

मुंबई : शरद पवार दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेणार, ईडीच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देण्याची शक्यता

25/09/2019,12:30PM
Baramati Bandh to support Sharad Pawar, शरद पवारांवरील ईडीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादीच्या समर्थकांकडून ‘बारामती बंद’ची हाक

पुण्यात पोलिस-आंदोलकांची बाचाबाची

पुणे – शरद पवारांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने पुण्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, पुण्यातील मंडईत राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन, सरकार आणि मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी, पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची

25/09/2019,12:05PM
Baramati Bandh to support Sharad Pawar, शरद पवारांवरील ईडीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादीच्या समर्थकांकडून ‘बारामती बंद’ची हाक

बारामतीत आंदोलकांना पोलिसांनी पांगवलं

25/09/2019,12:01PM
Baramati Bandh to support Sharad Pawar, शरद पवारांवरील ईडीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादीच्या समर्थकांकडून ‘बारामती बंद’ची हाक

औरंगाबादेत कार्यकर्त्याचं अर्धनग्न आंदोलन

शरद पवारांना ईडीची नोटीस बजावल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसची अर्धनग्न निदर्शनं, औरंगाबादच्या क्रांतिचौकात अंगावरील कपडे काढून तरुणांकडून सरकारचा निषेध, भाजप सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तरुणांची घोषणाबाजी

25/09/2019,11:18AM

बारामती शहराबरोबरच तालुक्यातही बंद पुकारण्यात आला आहे. बारामतीतील शारदा प्रांगणात सकाळी 10 वाजता नागरिकांना निषेध सभेला उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या सभेनंतर ‘बंद’ची पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. भाजप सरकार सूडबुद्धीने शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बारामती बंदची हाक दिली आहे. ऐन विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापण्याची चिन्हं आहेत.

दरम्यान, चोर तो चोर वर शिरजोर असं म्हणत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बारामती बंदला (Baramati Bandh to support Sharad Pawar) ट्विटरवरुन विरोध केला आहे.

अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने मनी लाँड्रिंग अर्थात आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीने गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये अजित पवार यांच्यासह 70 माजी संचालकांचा समावेश आहे. राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. संचालक मंडळाने नियमांचं उल्लंघन केल्याने बँकेला फटका बसला.

शरद पवार काय म्हणतात?

ज्या संस्थेचा मी सभासदही नव्हतो, त्यात माझं नाव गोवलं गेलंय. याबाबत अधिक काही बोलण्याची गरज नाही. राज्यभरात माझे सुरु असलेले दौरे सुरुच राहतील, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी ‘टीव्ही9 मराठी’ला दिली.

राज्यभरात मला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने ही कारवाई झाल्याचा दावा शरद पवारांनी केला आहे. “मी राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये गेलो, तिथे मला आणि माझ्या पक्षाला तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर माझ्यावर अशी कारवाई झाली नसती, तरच मला आश्चर्य वाटलं असतं. निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई होत आहे. महाराष्ट्रातील जनतेसमोर हे आल्यानंतर सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत उत्तर मिळेल.” असंही पवार म्हणाले होते.

रोहित पवारांचा टोला

‘लहानपणी क्रिकेट खेळताना एखादा चांगलं खेळत असेल, तर लगेच एखादा चिडका मुलगा यायचा. माझी बॅट, माझा बॉल म्हणून चिडून बॅट-बॉल घेवून जायचा. तसंच हे ED चं प्रकरण चालू असल्याचा संशय येतो. चांगलं खेळता येत नसलं की काहीही करून चिडायचं.’ असं रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. ‘फक्त एक गोष्ट लक्षात असूदे आपला गडी लय भारी आहे.’ असं सांगायलाही रोहित विसरले नाहीत.

राष्ट्रवादीच्या नेत्यांची सभा

दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या निमित्ताने ही बैठक होणार आहे. जयंत पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार आहेत. अजित पवारही बैठकीला हजर असण्याची शक्यता आहे. खासदार सुप्रिया सुळे यांना डेंग्यूची लागण झाल्यामुळे सक्तीची विश्रांती सांगितली आहे.

संबंधित बातम्या 

शिखर बँक घोटाळा : अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा झटका, फसवणुकीचा गुन्हा रद्द करण्यास नकार

पवार काका-पुतण्यांवर ईडीकडून मनी लाँडरिंगचा गुन्हा

पवारांवर ईडीच्या कारवाईनंतर बारामतीत बंदची हाक

मी सभासदही नव्हतो त्या संस्थेच्या खटल्यात नाव गोवलं : शरद पवार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *