IND vs NZ T20 : टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी, होम ग्राऊंडवर न्यूझीलंडला व्हाईटवॉश

नववर्षात पहिला परदेशी दौरा खेळणाऱ्या टीम इंडियाने नवा इतिहास रचला (New Zealand vs India) आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या टी-20 सामन्यात इंडियाने 7 धावांनी विजय मिळवला आहे.

IND vs NZ T20 : टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी, होम ग्राऊंडवर न्यूझीलंडला व्हाईटवॉश
Follow us
| Updated on: Feb 02, 2020 | 7:27 PM

मुंबई : नववर्षात पहिला परदेशी दौरा खेळणाऱ्या टीम इंडियाने नवा इतिहास रचला (New Zealand vs India) आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या टी-20 सामन्यात भारताने 7 धावांनी विजय मिळवला आहे. तसेच टीम इंडियाने न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला आहे. न्यूझीलंडच्या होम ग्राऊंडवरच टीम इंडियाने अशाप्रकारे व्हाईटवॉश देत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताने न्यूझीलंडला 163 धावांचे आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड 20 षटकांत 156 धावा केल्या. त्यामुळे पाचव्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 7 धावांनी विजय झाला.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाचव्या टी-20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर लोकेश राहुल आणि रोहित शर्माच्या आक्रमक खेळाच्या जोरावर भारताने पाचव्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात 3 बाद 163 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 164 धावांची गरज होती. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल हा अवघ्या 2 धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या कॉलिन मुन्रोने 15 धावा केल्या. तर टॉम ब्रूस धावबाद होत शून्यावर माघारी परतला.

यानंतर टिम सेफर्ट आणि रॉस टेलरने न्यूझीलंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. टीम सेफर्टने अवघ्या 30 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकाराच्या मदतीने अर्धशतकी खेळी केली. तर रॉस टेलरने 47 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 53 धावा केल्या. मात्र नवदिप सैनीच्या चेंडूवर उंच फटका मारण्याच्या नादात सेफर्ट बाद झाला आणि सेफर्ट-टेलरची जोडी तुटली.

रॉस टेलरव्यतिरिक्त मैदानात उतरलेल्या डॅरेल मिशेल, मिशेल स्टॅनर, स्कॉट कुगेलेइन या कोणालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाची अवस्था 20 षटकांत 9 बाद 156 धावा अशी झाली. यामुळे टीम इंडियाचा 7 धावांनी विजय झाला. यात जसप्रीत बुमराहने 3, नवदीप सैनी आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी 2 आणि वॉशिंग्टन सुंदरने 1 विकेट घेतली.

पाचव्या टी-20 सामन्यात टीम इंडियाच्या संघात थोडासा बदल करण्यात आला होता. कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्याने उपकर्णधार रोहित शर्मा याने सामन्यात नेतृत्व केले. त्यामुळे रोहित शर्माने प्रथम फलंदाजीसाठी न जाता यष्टीरक्षक संजू सॅमसंग आणि लोकेश राहुल यांना पाठवले. पण संजू सॅमसंगने मिळालेल्या संधीचे सोनं न करता अवघ्या 2 धावा करत तंबूत परतला. यामुळे टीम इंडियाची सुरुवात थोडी खराब झाली.

त्यानंतर सामन्याचे नेतृत्व करत असलेला रोहित शर्मा फलंदाजीसाठी मैदानात उतरला. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या जोडीने टीम इंडियाचा डाव सावरला. रोहित आणि राहुलच्या या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी तब्बल 95 धावांची भागीदारी केली. यात रोहित शर्माने 41 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 60 धावा केल्या. तर लोकेश राहुलने 33 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 45 धावा केल्या.

पण 12 व्या षटकांत उंच फटका मारण्याच्या नादात लोकेश राहुल झेलबाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या श्रेयस अय्यरच्या मदतीने रोहितने धडाकेबाज फलंदाजी सुरु ठेवली. मात्र 60 धावा करत रोहित शर्माही माघारी परतला. त्यानंतर शिवम दुबे हा 5 धावा करुन बाद झाला. त्यामुळे अखेरच्या षटकांत श्रेयस  अय्यर आणि मनिष पांडे या जोडीने 15 धावांची भागीदारी करत भारताची धावसंख्या 3 बाद 163 पर्यंत पोहोचवली.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.