निर्भया प्रकरण : नाश्ता, जेवण नाही, अखेरची इच्छाही सांगितली नाही, कशी होती आरोपींची फाशीपूर्वीची रात्र?

फाशीच्या आदल्या रात्री चारही आरोपींपैकी फक्त मुकेश आणि विनयने रात्रीचं जेवण केलं. पवन आणि अक्षयने रात्रीचं जेवण केलं नाही.

निर्भया प्रकरण : नाश्ता, जेवण नाही, अखेरची इच्छाही सांगितली नाही, कशी होती आरोपींची फाशीपूर्वीची रात्र?
Follow us
| Updated on: Mar 20, 2020 | 11:42 AM

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही (Nirbhaya Convicts Last Wish) आरोपींना आज (20 मार्च) सकाळी 5.30 वाजता फासावर लटकवण्यात आलं. फाशीच्या आदल्या रात्री या चारही आरोपींमध्ये अस्वस्थता पाहायला मिळाली. ज्या सेलमध्ये या आरोपींना ठेवण्यात आले होते, तिथून त्यांना थेट फाशी देण्यात येणाऱ्या ठिकाणी नेण्यात आलं. कशी होती या आरोपींचा शेवटची रात्र? (Nirbhaya Convicts Last Wish) काय होती त्यांची अखेरची इच्छा?

फाशीच्या आदल्या रात्री चारही आरोपींपैकी फक्त मुकेश आणि विनयने रात्रीचं जेवण केलं. पवन आणि अक्षयने रात्रीचं जेवण केलं नाही. आरोपींचे वकील एपी सिंह (Nirbhaya Convicts Last Wish) यांनी आरोप लावला होता की, आरोपींना त्यांच्या कुटुंबाला भेटू दिलं जात नाही. मात्र, फाशीच्या काही वेळापूर्वी आरोपी मुकेशच्या कुटुंबाने त्याची शेवटची भेट घेतली होती.

हेही वाचा : नराधमांना फाशी! लेकीच्या फोटोला उराशी कवटाळून निर्भयाची आई म्हणते…

अतिशय अस्वस्थतेत या सर्व आरोपींनी शेवटची रात्र काढली. रात्रभर आरोपी झोपू शकले नाही. आरोपींना पहाटे नाश्ता विचारण्यात आला. मात्र, त्यांनी नाश्ता केला नाही.

या चारही आरोपींना तिहारच्या जेल क्रमांक 3 मध्ये ठेवण्यात आलं होतं. यापैकी एका आरोपीला वॉर्ड क्रमांक 1 मध्ये ठेवण्यात आलं होतं, दुसऱ्या आरोपीला वॉर्ड क्रमांक 7 मध्ये, तर इतर दोन आरोपींना वॉर्ड क्रमांक 8 मध्ये ठेवण्यात आलं होतं. या सेलचे रस्ते थेट फाशी देण्यात येणाऱ्या ठिकाणी जातात.

रात्रभर या आरोपींवर पाळत ठेवण्यात आली. त्यासाठी 15 जणांची टीम तयार करण्यात आली होती.फाशीपूर्वी पहाटे 4 वाजता या चारही आरोपींना उठवण्यात आलं. त्यानंतर त्यांना अंघोळ करुन नवीन कपडे घालण्यास सांगण्यात आलं,. मात्र, आरोपी विनयने कपडे बदलण्यास नकार दिला आणि तो रडू लागला. यावेळी त्याने त्याच्या गुन्ह्याची माफीही मागितली.

मुकेश, विनय, पवन आणि अक्षय, निर्भयाच्या या चारही आरोपींपैकी एकानेही अखेरची इच्छा सांगितली नाही.

या चारही दोषींना फाशी दिल्यानंतर त्यांच्या मृतदेहांना दीनदयाल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेलं गेलं. या आरोपींकडून तुरुंगवासादरम्यान जो काही पैसा कमावला गेला तो त्यांच्या कुटुंबाला देण्यात येईल.

निर्भया बलात्कार प्रकरण

राजधानी दिल्लीत चालत्या बसमध्ये सहा नराधमांनी 16 डिसेंबर 2012 रोजी एका तरुणीवर पाशवी बलात्कार केला होता. गँगरेपच्या या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. नराधमांनी केलेल्या अत्याचारांमुळे तरुणीची प्रकृती बिकट झाली होती. देशभरातून तिच्यासाठी प्रार्थना केल्या जात होत्या, मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.

नऊ महिन्यांनंतर सप्टेंबर 2013 मध्ये कनिष्ठ कोर्टाने दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. मार्च 2014 मध्ये उच्च न्यायालयाने आणि मे 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. शेवटच्या क्षणापर्यंत आरोपींनी शिक्षा रद्द करण्याचा खटाटोप केला, मात्र सुदैवाने तो व्यर्थ ठरला.

22 जानेवारी, 1 फेब्रुवारी आणि 3 मार्च रोजी दोषींना फासावर चढवण्यासाठी काढण्यात आलेले ‘डेथ वॉरंट’ कायद्यातील पळवाटांमुळे निष्प्रभ ठरले होते. राष्ट्रपतींनी सर्व दोषींच्या दयायाचना फेटाळून लावल्यानंतर प्रदीर्घ काळापासून कायद्यातील पळवाटांचा फायदा उठवून फाशीची शिक्षा टाळण्याचे सर्व कायदेशीर पर्याय संपले. दिवसभरात दोषींच्या सहा याचिका फेटाळण्यात आल्या.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पवन गुप्ता आणि अक्षय ठाकूर यांची दुसरी दया याचिका फेटाळली. त्याला आव्हान देणारी अक्षयची याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. पवन गुप्ताने दाखल केलेली क्युरेटिव्ह याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, तर 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर सामूहिक बलात्कार आणि हत्येची घटना घडली तेव्हा आपण दिल्लीत नव्हतो, असा दावा करणारी मुकेश सिंहची (Nirbhaya Convicts Last Wish) याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.