गडकरींनाच कृषीमंत्री करा, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याचं थेट मोदींना पत्र

नाशिक : कांद्याला मातीमोल बाजार भाव मिळाल्याने नाशिकच्या निफाड तालुक्यातील नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे कांदा विकून मिळालेले 1064 रुपये पंतप्रधान कार्यालयाला मनीऑर्डर केल्याने चांगलाच चर्चेत आले. आता याच शेतकऱ्याने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मोर्चा वळवलाय. नितीन गडकरी यांना कृषीमंत्री करण्यात यावे अशी मागणी मोदींकडे हस्तलिखित पत्राद्वारे केली आहे. साठे यांनी …

गडकरींनाच कृषीमंत्री करा, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याचं थेट मोदींना पत्र

नाशिक : कांद्याला मातीमोल बाजार भाव मिळाल्याने नाशिकच्या निफाड तालुक्यातील नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे कांदा विकून मिळालेले 1064 रुपये पंतप्रधान कार्यालयाला मनीऑर्डर केल्याने चांगलाच चर्चेत आले. आता याच शेतकऱ्याने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मोर्चा वळवलाय. नितीन गडकरी यांना कृषीमंत्री करण्यात यावे अशी मागणी मोदींकडे हस्तलिखित पत्राद्वारे केली आहे.

साठे यांनी लोकसभेत बहुमत मिळाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले असून त्याचबरोबर त्यांनी मोदींना एक भेट पाठवली आहे. या भेटीत एक गांधी टोपी, दोन रुमाल आणि एक हस्तलिखीत पत्र आहे.

गेल्यावर्षी नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे या शेतकर्‍याने कांद्याला मातीमोल बाजार भाव मिळाल्याने कोसळणार्‍या दराबाबत नाराजी व्यक्त करीत कांदा विक्रीतून आलेले सर्व 1064 रुपये 29 नोव्हेंबर रोजी निफाड पोस्टातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे मनीऑर्डर करून पीएमओला पाठविले होते. कांदा उत्पादकांच्या व्यथा पंतप्रधानांसमोर मांडण्याचा प्रयत्न साठे यांनी केला होता. त्या मनीऑर्डरनंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संजय साठे यांची चौफेर चौकशी करून अहवाल तयार करण्यात आला होता.

याबाबत बाजार समितीलाही माध्यमांकडे खुलासा करण्याची वेळ आली. संजय साठे यांच्या या कृतीचे शेतकर्‍यांनी समर्थन केले होते. मनीऑर्डरनंतरच्या बाराव्या दिवशी सोमवारी (दि. १०) 1064 रुपये नैताळे पोस्टात परत आले होते. मात्र अद्यापही शेतकऱ्यांचे प्रश्न न सुटल्याने नितीन गडकरी यांना शेतीची असलेली माहिती आणि शेतकऱ्यांना शेती करताना येणाऱ्या समस्या यांची माहिती असल्याने त्यांना कृषी मंत्री करण्याचा या मंत्री मंडळाच्या शपथविधी कार्यक्रमानिमित पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी पत्राद्वारे आग्रह केला.

गेल्या पाच वर्षात कृषीमंत्र्याचं तोंडही शेतकऱ्यांना पाहायला मिळालं नाही. त्यामुळे गडकरींसारख्या मंत्र्याकडे कृषी खातं असावं ही मागणी अनेकांकडून केली जात आहे. गडकरींच्या रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने अनेक कामे विक्रमी वेळात केली आहेत. शिवाय रस्ते बांधणीचा वेगही वाढवलाय. त्यामुळे देशातील शेतकरी प्रश्न सोडवण्यासाठी गडकरींची मागणी होत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी यापूर्वीही गडकरींच्याच दालनात कृषी खात्यासंबंधी बैठकी घेतल्या जात होत्या.

संबंधित बातम्या :

Archived: कांद्याचे पैसे मोदींना पाठवले, PMO चं नाशिकच्या शेतकऱ्याला ‘रिटर्न गिफ्ट’

कांदा उत्पादक शेतकऱ्याने मोदींना पाठवलेल्या मनीऑर्डरला PMO चं उत्तर

तीन टन कांदा विक्रीतून 6 रुपये उरले, शेतकऱ्याने मनी ऑर्डरने मुख्यमंत्र्यांना पाठवले!

कांद्याचे पैसे मोदींना पाठवल्याने इगो हर्ट, शेतकऱ्याची चौकशी सुरु

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *