चाळीसगावात 98 शाळा तीन वर्षांपासून 'अंधारात'

चाळीसगाव : एकीकडे सरकार ‘डिजीटल शाळा’ तयार करण्यासाठी पुढाकार घेत आहे, तरी दुसरकीडे सरकारच्या या महत्त्वांकांक्षी स्वप्नांना हरताळ फासण्याचे काम सुरु असल्याचे दिसून येते आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील 98 शाळांचा शाळेचा वीज पुरवठा तीन वर्षांपासून खंडित करण्यात आल्याची खळबळजनक माहिती अधिकार कार्यकर्ता प्रमोद चव्हाण यांनी उघडकीस आणली आहे. 8 लाख 11 हजार इतका वीज बिल …

Digital School, चाळीसगावात 98 शाळा तीन वर्षांपासून ‘अंधारात’

चाळीसगाव : एकीकडे सरकार ‘डिजीटल शाळा’ तयार करण्यासाठी पुढाकार घेत आहे, तरी दुसरकीडे सरकारच्या या महत्त्वांकांक्षी स्वप्नांना हरताळ फासण्याचे काम सुरु असल्याचे दिसून येते आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील 98 शाळांचा शाळेचा वीज पुरवठा तीन वर्षांपासून खंडित करण्यात आल्याची खळबळजनक माहिती अधिकार कार्यकर्ता प्रमोद चव्हाण यांनी उघडकीस आणली आहे. 8 लाख 11 हजार इतका वीज बिल थकीत असल्याचे कारण देत वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

वीज पुरवठाच खंडीत झाल्याने ‘डिजीटल शाळा’ करण्याच्या नावे शाळेला देण्यात आलेल्या 47 संगणक, 21 शाळांना प्रोजेक्टर, 41 एलईडी टीव्ही इत्यादी वस्तू धूळ खात पडली आहेत.

शाळेच्या वीज बिलासाठी कुठलीही तरतूद नसल्याने निधीतून बिळासाठी पैसा काढता येत नाही, म्हणून अनेक शाळा वीज बिल भरली गेले नाही म्हणून विजेविना आहेत. आर्थिक तरतूद करण्याबाबत योग्य ते निर्देश प्रमोद चव्हाण यांच्या तक्रारीनंतर देण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक गतशिक्षण अधिकारी यांनी दिली.

लाखो रुपयांचे साहित्य डिजिटल शाळा आणि आधुनिक पद्धतीचं शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्गाला मिळावे, आजच्या प्रगतयुगात त्याला शहरी विद्यार्थ्यांशी स्पर्धा करता यावी, यासाठी अत्याधुनिक वस्तूंची खरेदी करण्यात आली खरी, पण शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे या संकल्पनेला हरताळ फासला जात असल्याचं उघड झाले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *