राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदावर विरजण, दिवाळीपूर्वी पगार नाही

9 ऑक्टोबर रोजी राज्य सरकारकडून दिवाळीपूर्वी म्हणजेच 24 ऑक्‍टोबरच्या पूर्वी कर्मचाऱ्यांचा पगार (Government employees salary) करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदावर विरजण, दिवाळीपूर्वी पगार नाही

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडलं आहे. कारण, दिवाळीपूर्वी पगार (Government employees salary) देण्याचा निर्णय स्थगित करण्यात आलाय. लेखा कोषागार विभागातील कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने वित्त विभागाला आगावू पगार करता येणार नसल्याचं कारण देण्यात आलं आहे. 9 ऑक्टोबर रोजी राज्य सरकारकडून दिवाळीपूर्वी म्हणजेच 24 ऑक्‍टोबरच्या पूर्वी कर्मचाऱ्यांचा पगार (Government employees salary) करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पेन्शनधारकांसह सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळणार असल्याचं सरकारने सांगितलं होतं. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा जोरात होणार असल्याचं चित्र होतं. सरकारी कर्मचाऱ्यांना दरमहिन्याच्या 1 तारखेला पगार दिला जातो. पण यंदा दिवाळी महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 25 तारखेला असल्यामुळे लवकरच पगार दिला जाणार होता.

दिवाळीच्या काळातच विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची नाराजी नको, शिवाय त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आठ दिवस आधीच पगार देण्याचा निर्णय सरकारने घेतला. पण वित्त विभागाला निवडणुकीचं काम असल्याने 1 तारखेपूर्वी पगाराची प्रक्रिया पूर्ण करणं अशक्य असल्याचं सांगण्यात आलंय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *