केवळ शिवसेनेनं नाही तर काँग्रेसनेही CAA समजून घ्यावा : कुमार केतकर

काँग्रेसला सुद्धा ते स्वत: समजून घ्यावं लागले. नुसतं शिवसेनेला सांगून चालणार नाही," असे वक्तव्य ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी (Kumar Ketkar on CAA)  केलं.

केवळ शिवसेनेनं नाही तर काँग्रेसनेही CAA समजून घ्यावा : कुमार केतकर
Follow us
| Updated on: Feb 22, 2020 | 3:55 PM

पुणे : “एनआरसी, सीएए, एनपीआर हा विषय गुंतागुंतीचा आहे. केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाही तर काँग्रेसला सुद्धा ते स्वत: समजून घ्यावं लागेल. नुसतं शिवसेनेला सांगून चालणार नाही,” असे वक्तव्य ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी (Kumar Ketkar on CAA)  केलं. “काँग्रेसमधील काही लोकं एनआरसी, सीएए आणि एनपीआरच्या बाजूने बोलले आहेत,” असेही कुमार केतकर म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यात सीएए, एनआरसी आणि एनपीआरबाबत केलेल्या वक्तव्यावरुन महाविकासआघाडीत धुसफूस होत आहे. उद्धव ठाकरे यांनी CAA चा अभ्यास करावा असा सल्ला काँग्रेसने दिला होता. त्यावरुन कुमार केतकरांनी काँग्रेस नेत्यांना टोला लगावला.

“उद्धव ठाकरे हे एनआरसी, सीएए, एनपीआर यावर आपली बदलेली भूमिका सांगत आहेत. काही काँग्रेस नेत्यांनी अगोदर एनआरसी, सीएए, एनपीआर आणि कलम 370 ला अगोदरच पाठिंबा जाहीर केला होता,” असेही कुमार केतकर म्हणाले.

“एनआरसी, सीएए, एनपीआर याचे विरोधक असणाऱ्यांमध्ये सुद्धा सरकारच्या भूमिकेला समर्थन असणारे लोक आहेत. हे ओळखून तसेच आपल्याला किती विरोध होईल हे पाहून उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका जाहीर केलेली आहे,” असेही कुमार केतकर यांनी (Kumar Ketkar on CAA)  म्हटलं.

“एनआरसी, सीएए, एनपीआर हा विषय गुंतागुंतीचा आहे. केवळ उद्धव ठाकरेंना नाही तर काँग्रेसवाल्यांना स्वतः सुद्धा समजून घ्यावं लागेल. नुसतं शिवसेनेला सांगून चालणार नाही. काँग्रेस काही लोक सुद्धा एनआरसी, सीएए, एनपीआरच्या बाजूने बोललेले आहेत,” असेही कुमार केतकर म्हणाले.

“शिवसेना हा कायम भगव्या आघाडीत होता. त्यांना वेगळ्या पद्धतीने समजून सांगावं लागेल. किमान समान कार्यक्रमावर एकजूट असेल तर सरकार पडायचं कारण नाही,” असं वक्तव्यही कुमार केतकरांनी दिला.

“मनसे बांगलादेशींना शोधण्याच काम करतं, हे पूर्णतः बेकायदेशीर आहे. त्यांच्यावरच कारवाई व्हायला हवी. पण मनसे जे करते तेच पोलीस आणि अमित शहा यांच्या मदतीने करते आहे, त्यामुळे त्यांना कोण सांगणार,” असा टोलाही कुमार केतकरांनी मनसेला (Kumar Ketkar on CAA)  लगावला.

संबंधित बातम्या : 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आधी CAA समजून घ्यावा, काँग्रेसचा सल्ला 

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.