पुण्यात अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून जळालेल्या नोटा

रणजीत जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे : देशभरात दिवाळीचा उत्सव सुरू असल्याने दोन दिवस बँकांना सुट्टी आहे. याचाच ताण एटीएमवरती पडला आहे. पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये ऐन दिवाळीत अनेक एटीएम मशिनमधील पैसे संपले आहेत. त्यामुळे एटीएममध्ये खडखडाट आहे. अशातच अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून चक्क जळालेल्या नोटा आल्याचं समोर आलंय. अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये पैसे असल्याचं समजताच लोकांनी पैसे […]

पुण्यात अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून जळालेल्या नोटा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

रणजीत जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे : देशभरात दिवाळीचा उत्सव सुरू असल्याने दोन दिवस बँकांना सुट्टी आहे. याचाच ताण एटीएमवरती पडला आहे. पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये ऐन दिवाळीत अनेक एटीएम मशिनमधील पैसे संपले आहेत. त्यामुळे एटीएममध्ये खडखडाट आहे. अशातच अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून चक्क जळालेल्या नोटा आल्याचं समोर आलंय.

अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये पैसे असल्याचं समजताच लोकांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केली. पण ग्राहकांची घोर निराशा झाली. अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये पैसे तर आले, पण ते जळालेल्या अवस्थेत होते हे पाहून ग्राहकांना धक्काच बसला.

अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास दोन हजारांच्या नोटा जळालेल्या होत्या. या नोटा ऐन दिवाळीत नागरिकांच्या हातात पडल्याने मोठी तारांबळ उडाली. या जळालेल्या नोटा कुणीही घेत नसल्याने ऐन सणासुदीच्या काळात त्रास सहन करावा लागला.

बँकांनाही सुट्टी असल्याने तक्रार कुणीकडे करायची असा प्रश्न निर्माण झालाय. एकीकडे एटीएममध्ये पैसे नसल्याने ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागतोय, कारण दुसरीकडे बँकाही बंद आहेत. ऑनलाईन व्यवहार प्रत्येकवेळी शक्य होत नाही. त्यात अॅक्सिस बँकेच्या एटीएममधील हा प्रकार संताप आणणारा आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.