आघाडीचा 3 जागांचा तिढा, नगरमध्ये सुजय विखेंना उमेदवारी? 

मुंबई: लोकसभेच्या 2019 निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीचा तिढा जवळपास सोडवला आहे. ज्या सहा जागांमध्ये वाद होता, त्यापैकी तीन जागांचा वाद कायम आहे.  यामध्ये नंदुरबार, अहमदनगर, औरंगाबादच्या जागेचा समावेश आहे.  महत्त्वाचं म्हणजे अहमदनगरची जागा मिळवण्यात काँग्रेसला यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इथून राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. […]

आघाडीचा 3 जागांचा तिढा, नगरमध्ये सुजय विखेंना उमेदवारी? 
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

मुंबई: लोकसभेच्या 2019 निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीचा तिढा जवळपास सोडवला आहे. ज्या सहा जागांमध्ये वाद होता, त्यापैकी तीन जागांचा वाद कायम आहे.  यामध्ये नंदुरबार, अहमदनगर, औरंगाबादच्या जागेचा समावेश आहे.  महत्त्वाचं म्हणजे अहमदनगरची जागा मिळवण्यात काँग्रेसला यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इथून राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

नगर, नंदुरबार आणि औरंगाबादच्या जागेवरुन आघाडीत बोलणी सुरु असून नगरची जागा काँग्रेसनं राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलासाठी प्रतिष्ठतेची केली आहे. नगरची जागा ही सुजय विखे लढण्यासाठी इच्छूक असून ती जागा राष्ट्रवादीकडून मिळवायचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

दुसरीकडे काँग्रेसकडे असलेली औरंगाबादची जागा राष्ट्रवादी आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असून औरंगाबाद आणि नगरमध्ये अदलाबदल करण्यास दोन्ही पक्षांची सहमती असल्याचं सूत्रांचं मत आहे. राष्ट्रवादीला तिथून सतीश चव्हाण यांना उमेदवारी द्यायची आहे.

नंदुरबराच्या जागेचा तिढा सहजासहजी सुटण्याची शक्यता नसून तिथून माणिकराव गावित रेकॉर्ड ब्रेकवेळा लोकसभेवर गेले आहेत. असं असलं तरी राष्ट्रवादी एका विद्यमान आयात खासदारासाठी ही जागा हवी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जागा निवडून यायची श्वाश्वती असल्यानंच राष्ट्रवादी या जागेसाठी आग्रही आहे.

रत्नागिरी आणि पुण्याची जागा काँग्रेसकडे राहणार आहे. याबाबत 15 जानेवारीला दिल्लीत आघाडी नेत्यांची पुन्हा बैठक होणार आहे.

नंदुरबारची जागा आपल्याला देण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कोट्यातली अहमदनगरची जागा काँग्रेसला देण्याची तयारी राष्ट्रवादीने केली आहे. त्याबदल्यात काँग्रेस कोट्यातली औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला सोपवण्यास दोन्ही पक्षात सहमती झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

त्यामुळे अहमदनगरमध्ये काँग्रेसकडून सुजय विखे पाटील, तर औरंगाबादमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश चव्हाण लोकसभेचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरी आणि पुण्याची जागा काँग्रेसकडे राहणार  आहे. याबाबत 15 जानेवारीला दिल्लीत आघाडी नेत्यांची पुन्हा बैठक होणार आहे. त्यावेळी नंदुरबार, अहमदनगर, औरंगाबादच्या जागेवर शिक्कामोर्तब होईल.

त्या 6 जागा, जिथे काँग्रेस-राष्ट्रवादीला जिंकण्याची पूर्ण हमी!

संबंधित बातम्या 

अहमदनगर लोकसभा : भाजपातूनच विरोध, यावेळी खा. दिलीप गांधींचं काय होणार?

अखेर राष्ट्रवादीने पुण्याच्या जागेचा हट्ट सोडला!  

भाजपच्या गुप्त सर्व्हेचे आकडे उघड, शिवसेनेसोबतच्या युतीसाठी धडपड 

धक धक गर्ल पुण्यातून लोकसभेच्या रिंगणात? 

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.