फेसबुक चॅटिंगमुळे दोघांचा मृत्यू, एकाची हत्या तर दुसऱ्याची आत्महत्या

फेसबुकवर चॅटिंग केल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू तर दुसऱ्याने आत्महत्या (Murder and Suicide in Telangana) केली आहे.

फेसबुक चॅटिंगमुळे दोघांचा मृत्यू, एकाची हत्या तर दुसऱ्याची आत्महत्या

हैद्राबाद : फेसबुकवर चॅटिंग केल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू तर दुसऱ्याने आत्महत्या (Murder and Suicide in Telangana) केली आहे.  ही घटना तेलंगणामधील गदवाल आणि महबूबनगरमध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कार्तिक आणि सुधा अशी मृतांची नावं आहेत. पोलीस या घटनेचा अधिक तपास (Murder and Suicide in Telangana) करत आहेत.

गदवाला जिल्ह्याच्या वेंकटरमणा कॉलनीतील सुधा आणि कार्तिक पदवीचा अभ्यास करत होते. यावेळी कार्तिक सुधावर एकतर्फी प्रेम करत होता. पण 2011 ला तिचे लग्न महबूबनगरच्या उदयकुमारसोबत झाले. लग्नानंतर काही वर्षांनी कार्तिक आणि सुधा या दोघांचे फेसबुकवर बोलणे झाले. तरुणाने विवाहितेला विश्वास दिला की, तो तिच्यासोबत मित्राप्रमाणे राहील. त्याने विवाहितेची वैयक्तिक माहिती काढली आणि तिला त्रास देण्यास सुरुवात केली. याचदरम्यान कार्तिकची हत्या झाली. हत्येचा आरोप माझ्यावर नको यावा म्हणून सुधानेही आत्महत्या केली.

गदवालमध्ये ड्रायव्हरचे काम करत असलेला कार्तिक 24 फेब्रुवारीला महबूबनगर जाण्यासाठी घरातून निघाला पण पून्हा परतला नाही. त्यावर कार्तिकचे वडील नागेंदर यांनी 26 फेब्रुवारीला पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली होती.

पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर गदवाल मंडलमध्ये मेल्लाचेरुवू पहाडीजवळ एक मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सापडलेला मृतदेह कार्तिकचा होता. कार्तिकची हत्या झाल्याचे ऐकून सुधाला धक्का बसला. त्याच्या हत्येचा आरोप माझ्यावर येईल या भीतीने 28 फेब्रुवारीला सुधाने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने म्हटले की, मी मानसिक तणावाखाली आहे. माझ्या मुलाची काळजी ठेवा, असं सांगून तिने फोन ठेवला आणि फोन स्विच ऑफ केला.

मुलाकडून सुधाला जीवंत मारण्याची धमकी

गेल्यावर्षी कार्तिकने फेसबुकवर सुधाला फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली आणि तिच्याशी मैत्री केली होती. काहीदिवस दोघे फेसबुकवर मित्र-मैत्रिणीसारखे राहिले. पण त्यानंतर सुधाने त्याच्यासोबत बोलणे कमी केले. यावर कार्तिकने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तू माझ्यासोबत बोलली नाहीस तर मी तुझ्या पतीला जाऊन सांगेल की आपल्यामध्ये संबंध आहे, अशी धमकी तरुण विवाहितेला देऊ लागला. तसेच पती, आई आणि वडिलांची हत्या करेल, असेही त्याने सांगितले.

दरम्यान, या हत्या आणि आत्महत्येच्या घटनेवरुन संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस प्रत्येक बाजूने शोध घेत आहेत. कार्तिकचा एक मित्र आहे जो फेसबुकच्या माध्यमातून सुधासोबत जोडला होता. कार्तिक त्रास देत असल्याचे सुधाने त्याच्या मित्राला सांगितले होते. यावर मित्राने कार्तिकला असे न करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे कार्तिकच्या मित्रावरही संशय व्यक्त केला जात आहे, अशी माहिती मिळत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *