हवा कुणाचीही येऊ द्या, बारामतीत हवा फक्त पवारांचीच : सुप्रिया सुळे

बारामती : आजपर्यंत हवा कोणाचीही आली तरी बारामतीत पवारांचीच हवा असते, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावलाय. कोणाला बारामतीत झालेला विकास दिसत नसेल तर आपण त्यांच्या डोळ्यांवर मोफत उपचार करुन त्यांना विकास दाखवू, असंही त्या म्हणाल्या. गेल्या पाच वर्षात भाजपने जाहिरातींवर तब्बल 10 हजार 110 कोटी रुपये खर्च केले. हेच पैसे जनतेसाठी वापरले असते […]

हवा कुणाचीही येऊ द्या, बारामतीत हवा फक्त पवारांचीच : सुप्रिया सुळे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

बारामती : आजपर्यंत हवा कोणाचीही आली तरी बारामतीत पवारांचीच हवा असते, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावलाय. कोणाला बारामतीत झालेला विकास दिसत नसेल तर आपण त्यांच्या डोळ्यांवर मोफत उपचार करुन त्यांना विकास दाखवू, असंही त्या म्हणाल्या.

गेल्या पाच वर्षात भाजपने जाहिरातींवर तब्बल 10 हजार 110 कोटी रुपये खर्च केले. हेच पैसे जनतेसाठी वापरले असते तर त्यांचं भलं झालं असतं. मात्र स्वत:च्याच जाहिराती करण्यासाठी हे पैसे खर्च करण्यात आले. त्यामुळे आपण या निवडणुकीत कोणतंही सरकार आलं तरी संसदेत आवश्यकतेशिवाय इतर कामांसाठी जाहिरातीच करायच्या नाहीत याबद्दलचं विधेयक मांडणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

बारामती तालुक्यातल्या वाणेवाडी, वडगाव निंबाळकर, माळेगाव आदी गावांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाव भेट दौर्‍याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारचा समाचार घेतला. देशात भाजप सरकार आल्यापासून जाहिरातींवर तब्बल 10 हजार कोटींचा खर्च करण्यात आलाय. हीच रक्कम जर जनतेच्या भल्यासाठी वापरली असती तर त्यांचा फायदा झाला असता.. त्यामुळं आता या निवडणुकीनंतर कोणतंही सरकार आलं तरी आपण सरकारनं आवश्यकतेशिवाय जाहिरातच करु नये याबाबत विधेयक मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

बारामतीने 50 वर्षांपासून पवार कुटुंबीयांना साथ दिली. त्यामुळे देशात कोणतंही वारं आलं तरी बारामतीत हवा पवारांचीच असते. मात्र विरोधक म्हणतात बारामतीचा विकास झाला नाही. त्यांना बारामतीचा विकास दिसत नसेल तर बारामतीत होणार्‍या नेत्र तपासणी शिबिरात त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करु, तरच त्यांना विकास दिसेल, असाही टोला त्यांनी लगावला.

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.