मुंबई लोकल 7 दिवस बंद ठेवल्यास कोरोना संसर्ग टाळता येईल : पंकजा मुंडे

भाजपच्या नेत्या आणि माजी महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी कोरोनाच्या नियंत्रणासाठी मुंबई बंद करण्याच्या पर्यायावर भाष्य केलं आहे (Pankaja Munde on Mumai Lock Down).

मुंबई लोकल 7 दिवस बंद ठेवल्यास कोरोना संसर्ग टाळता येईल : पंकजा मुंडे
Follow us
| Updated on: Mar 17, 2020 | 4:21 PM

मुंबई : भाजपच्या नेत्या आणि माजी महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी कोरोनाच्या नियंत्रणासाठी मुंबई बंद करण्याच्या पर्यायावर भाष्य केलं आहे (Pankaja Munde on Mumai Lock Down). जर नियोजनबद्धपणे मुंबई बंद ठेवण्यात आली तर त्याचा लाखो लोकांना उपयोग होईल, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “मुंबई बंदची मदत होऊ शकते का? जर हे नियोजनबद्धपणे मुंबई बंद केली तर लोक यासाठी तयारी म्हणून जीवनावश्यक वस्तू घरात आणून ठेवतील. जर 7 दिवसांसाठी लोकल ट्रेन बंद राहिल्या तर लाखो लोकांना कोरोनाच्या संसर्गापासून रोखण्यात मदत होईल. आवश्यक दुकानं उघडी ठेवता येतील, मात्र शॉपिंग बंद ठेवावी. अशा प्रयत्नांचा नक्कीच उपयोग होईल.”

मी सतत भूमिका मांडतेय बाहेर पडू नका कोरोनापासून वाचवण्यासाठी गर्दी करणारे कार्यक्रम टाळा. त्यात मी आणि माझं कार्यालयही आलंच. आज तर मला बरं वाटत नाही. कृपया ‘ताई भेटायचं’ आहे असं सतत मेसेज करणाऱ्यांना माझी विनंती आहे घरीच थांबा, जीवन मरणाचं कारण असेल तर ठीक. यंत्रणांना काम करू द्या, अशीही भूमिका पंकजा मुंडे यांनी याआधी घेतली आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी अधिवेशनाचा कालावधी कमी करण्याचीही मागणी केली होती. त्या म्हणाल्या होत्या, “अधिवेशन कालावधी कमी केला, सुट्ट्या देणं, घरुन काम हे निर्णय विचारात आहेत. ते योग्य आहेत. मी अशी मागणी सर्वप्रथम जाहीरपणे केली आणि आता मी अंमलबजावणी करणार आहे! मी माझं कार्यालय हे 2 एप्रिलपर्यंत बंद ठेवणार आणि दौरेही रद्द करत आहे. सहकार्य करावे आणि स्वतः या गोष्टी पाळाव्यात ही विनंती.”

लोकांनी विनाकारण गर्दी करू नये आणि यंत्रणांवर ताण पडू देऊ नये. कोणाला कोरोनाची लागण होऊ नये यासाठी काळजी घ्या. शक्य तो घरी थांबा, असंही आवाहन पंकजा मुंडे यांनी आधीच केलं आहे. तसेच सौम्य स्वरुपाची जमावबंदी लावण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची मागणी केली आहे. यातून लोकांना अनावश्यक जमाव टाळण्यासाठी आदेश देण्यात यावा. हे लोकांच्या भल्यासाठी आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

  • पिंपरी चिंचवड – 9
  • पुणे – 7
  • मुंबई – 6
  • नागपूर – 4
  • यवतमाळ – 3
  • कल्याण – 3
  • नवी मुंबई – 3
  • रायगड – 1
  • ठाणे -1
  • अहमदनगर – 1
  • औरंगाबाद – 1
  • एकूण 39

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

  • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
  • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  • नागपूर (1) – 12 मार्च
  • पुणे (1) – 12 मार्च
  • पुणे (3) – 12 मार्च
  • ठाणे (1) – 12 मार्च
  • मुंबई (1) – 12 मार्च
  • नागपूर (2) – 13 मार्च
  • पुणे (1) – 13 मार्च
  • अहमदनगर (1) – 13 मार्च
  • मुंबईत (1) – 13 मार्च
  • नागपूर (1) – 14 मार्च
  • यवतमाळ (2) – 14 मार्च
  • मुंबई (1) – 14 मार्च
  • वाशी (1) – 14 मार्च
  • पनवेल (1) – 14 मार्च
  • कल्याण (1) – 14 मार्च
  • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
  • औरंगाबाद (1) – 15 मार्च
  • पुणे (1) – 15 मार्च
  • मुंबई (3) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • यवतमाळ (1) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • एकूण – 39 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?

  • कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
  • दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
  • मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
  • एकूण – 3 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

संबंधित बातम्या:

Maharashtra corona death | महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी, बाधिताच्या संपर्कात 9 जण

Maharashtra Corona: महाराष्ट्राला किंचित दिलासा, 15 तासात एकही नवा रुग्ण नाही : राजेश टोपे

पुण्यात तीन दिवस व्यापार बंद, मात्र किराणा, दूध, औषधे, भाजीपाला सुरु राहणार

Corona Updates: शिर्डीचे साईबाबा मंदिर आजपासून बंद

7000 मृत्यू, अमेरिकेत संचारबंदी, फ्रान्स लॉकडाऊन, कोरोनासमोर महाशक्तिशाली देशही हतबल

CoronaVirus: अमेरिकेत कोरोनावरील पहिल्या लसीची चाचणी, लवकरच बाजारात उपलब्ध होणार

Pankaja Munde on Mumai Lock Down

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.