जग जिंकता येतं, पण...., लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने पंकजा भावूक

मुंबई : महाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. 3 जून 2014 रोजी दिल्लीत कार अपघातात गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं. तळागाळातील लोकांसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र हळहळला होता. आज दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची पाचवी पुण्यतिथी आहे. महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी वडिलांच्या म्हणजेच दिवंगत गोपीनाथ मुंडे …

जग जिंकता येतं, पण...., लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने पंकजा भावूक

मुंबई : महाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. 3 जून 2014 रोजी दिल्लीत कार अपघातात गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं. तळागाळातील लोकांसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र हळहळला होता. आज दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची पाचवी पुण्यतिथी आहे. महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी वडिलांच्या म्हणजेच दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी जागवल्या आहेत.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांचा फोटो ट्वीट केला असून, या फोटोला दिलेल्या कॅप्शनमधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अत्यंत भावूक होत पंकजा मुंडे यांनी या ट्वीटमधून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दलच्या आपल्या भावना मांडल्या आहेत.

पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर जो फोटो शेअर केला आहे, त्या फोटोत दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा मुलगा आर्यमन दिसत आहे.

“मायेची सावली हरवली. सर्व मिळवता येतं, पण ही सावली नसल्याने ऊन पोळतं. जग जिंकता येतं, पण पाठीवर थाप मारायला कोणी नसतं. सदैव असंच वाटतं. काहीही मिळवलं तरी उणे मुंडे साहेब हाती काही उरतच नाही. आनंद छोटे आणि दुःखं ठेंगणी आहेत बाबा तुमच्या शिवाय..” असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

‘संघर्षयात्री’ काळाच्या पडद्याआड

गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर संघर्ष केला. तळागाळातल्या लोकांसाठी रस्त्यावर उतरुन सत्ताधाऱ्यांशी दोन हात केले. ज्यावेळी सत्ता मिळाली, त्यावेळी त्यांनी लोकांसाठी काम केले. 2014 साली भाजपप्रणित एनडीएची एकहाती सत्ता आली आणि गोपीनाथ मुंडे यांना तळागाळातल्या लोकांशी थेट संबंध असणारं ग्रामविकास खातंच मिळालं. मात्र, केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या सात दिवसातच गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *