पंकजा मुंडे, प्रणिती शिंदे, मंदा म्हात्रेंसह एकूण 235 महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीत एकूण 235 महिला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्या (Women Candidate in Assembly) आहेत.

पंकजा मुंडे, प्रणिती शिंदे, मंदा म्हात्रेंसह एकूण 235 महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Follow us
| Updated on: Oct 16, 2019 | 9:59 AM

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत एकूण 235 महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या (Women Candidate in Assembly) आहेत. या निवडणुकीत एकूण 3 हजार 237 उमदेवार आहेत. यात 3,001 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. तर चिंचवड मतदारसंघात जनहित लोकशाही पक्षामार्फत नितीश दगडू लोखंडे हे तृतीयपंथी उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

विधानसभा निवडणुकांचा जोरदार प्रचार राज्यात सुरु आहे. प्रत्येक पक्षाकडून महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच, महिलांचाही राजकारणातील सहभाग वाढत असल्याचं या आकड्यांवरुन दिसत (Women Candidate in Assembly) आहे.

दरम्यान, राज्यात प्रमुख महिला उमेदवारांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, मंदा म्हात्रे, प्रणिती शिंदे, रोहिणी खडसेंसह अनेक दिग्गज महिला उमेदवारांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

मुख्य निवडणूक आयोगाकडून 419 चलचित्र वाहनांना परवानगी

विधानसभा निवडणुकांसाठी सध्या उमेदवार आपला प्रचार करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करत आहेत. मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत आतापर्यंत 419 चलचित्र वाहनांना (मोबाईल एलईडी व्हॅन) परवानगी देण्यात आली आहे. गावोगावी ही चलचित्र वाहने पोहोचतात आणि प्रचार, प्रसार करतात.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

महाराष्ट्रातील 288 विधानसभेच्या जागांसाठी एकाच टप्प्यात 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबरला निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी, तर हरियाणामध्ये 1.28 कोटी मतदार आहेत. राज्यात 1.84 लाख ईव्हीएम मतदान प्रक्रियेत वापरली जातील. प्रत्येक ठिकाणी पाच व्हीव्हीपॅट स्लिप मोजल्या जाणार आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाच्या तारखा

अधिसूचना जारी करण्याची तारीख – शुक्रवार 27 सप्टेंबर 2019 नामांकन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख – बुधवार 4 ऑक्टोबर 2019 अर्जाची छाननी – गुरुवार 5 ऑक्टोबर 2019 अर्ज मागे घेण्याची तारीख – शनिवार 7 ऑक्टोबर 2019 मतदान – सोमवार 21 ऑक्टोबर 2019 मतमोजणी – गुरुवार 24 ऑक्टोबर 2019

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.