भाजपच्या माजी आमदारावर पक्षाच्याच नगरसेविकेकडून लैंगिक छळाचा आरोप, विधीमंडळातही जोरदार पडसाद

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर भाजपच्याच एका नगरसेविकांनी लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला आहे.

भाजपच्या माजी आमदारावर पक्षाच्याच नगरसेविकेकडून लैंगिक छळाचा आरोप, विधीमंडळातही जोरदार पडसाद
Follow us
| Updated on: Feb 26, 2020 | 11:33 PM

मुंबई : भारतीय जनता पक्षाकडून विधानसभेत महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशातच भाजपला धक्का मोठा धक्का बसला आहे (Allegation of Physical abuse on BJP MLA). भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर भाजपच्याच एका नगरसेविकांनी लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणाचे पडसाद अगदी विधीमंडळातही उमटले आहे. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास करण्याचं आश्वासन दिलं आहे.

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांवर त्यांच्याच पक्षाच्या नगरसेविका निला सोंस यांनी लैंगिक छळ केल्याचे आरोप केले. विशेष म्हणजे पीडित निला सोंस यांनी याप्रकरणी भाजपकडे स्टिंग ऑपरेशन आणि तक्रारही केली. मात्र, मेहतांवर कुठलीही कारवाई झाली नाही, अशी तक्रार सोंस यांनी केली. मेहतांकडून माझ्यासह कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याचीही भीती सोंस यांनी व्यक्त केली आहे. मंगळवारी (25 फेब्रुवारी) नीला सोन्स यांनी यासंदर्भात सोशल मीडियात एक व्हिडीओ पोस्ट करत आपली बाजू मांडली. त्यानंतर आज त्या स्वत: माध्यमांसमोर आल्या.

निला सोंस यांच्या आरोपांवर माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी काहीही बोलणं टाळलं आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच नरेंद्र मेहता यांनी अचानक भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यावेळी यामागील कारण स्पष्ट करण्यात आलं नव्हतं. मात्र, आता झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपानंतर भाजपकडूनच आपली कोंडी होऊ नये म्हणून त्यांचा राजीनामा घेतल्याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद बुधवारी (26 फेब्रुवारी) विधीमंडळात उमटले. महिला आमदारांनी याप्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर नरेंद्र मेहतांसंदर्भातील आधीच्या तक्रारीचा तपास करण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिले. नरेंद्र मेहता यांच्यावरील गंभीर आरोपांनंतर भाजपची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे. मेहतांवर भाजपच्याच नगरसेविकेचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावर भाजप काय भूमिका घेते, काय कारवाई करते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

Allegation of Physical abuse on BJP MLA

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.