पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंची उद्या महाराष्ट्रातली पहिली सभा

लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींची मराठवाड्यातील दुसरी सभा लातूर जिल्ह्यातील औसा इथे होत आहे. मंगळवारी म्हणजे उद्या सकाळी 9.30 वाजता ही सभा होईल. लातूर आणि उस्मानाबादच्या शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदींची सभा असेल. भाजपा -शिवसेना युतीच्या प्रचारार्थ आयोजित या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. दोन्ही जिल्ह्यातले मिळून दीड लाखांवर लोक या सभेला […]

पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंची उद्या महाराष्ट्रातली पहिली सभा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींची मराठवाड्यातील दुसरी सभा लातूर जिल्ह्यातील औसा इथे होत आहे. मंगळवारी म्हणजे उद्या सकाळी 9.30 वाजता ही सभा होईल. लातूर आणि उस्मानाबादच्या शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदींची सभा असेल. भाजपा -शिवसेना युतीच्या प्रचारार्थ आयोजित या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. दोन्ही जिल्ह्यातले मिळून दीड लाखांवर लोक या सभेला येतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या मोदींच्या या सभेची जोरदार तयारी सुरु आहे. दीड हजारांच्या वर पोलिसांचा मोठा बंदोबस्त दोन दिवसांपासून तैनात करण्यात आला आहे. कडेकोट बंदोबस्त असल्याने सभेला येणाऱ्या लोकांना पाण्याची बॉटल, बॅग किंवा काहीही साहित्य नेता येणार नाही.

लातूरमध्ये भाजपचे सुधाकर शृंगारे हे उमेदवार आहेत. त्यांची थेट लढत काँग्रेसच्या मच्छिंद्र कामत यांच्याशी होत आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राम  गारकर यांनाही लोकांचा प्रतिसाद वाढतो आहे. वंचित आघाडीला लोक स्वतः पैसे देऊन सभेला गर्दी करत असल्याने भाजप आणि काँग्रेसची डोकेदुखी वाढू शकते. लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या वतीने पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, तर काँग्रेसकडून आमदार अमित देशमुख हे प्रचाराची यंत्रणा संभाळत आहेत.

मोदींची मंगळवारी सकाळी औसा इथं होणारी सभा ही लातूर राखीव मतदारसंघ आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ अशा दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केली आहे. उस्मानाबाद येथून शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर हे उमेदवार आहेत, तर त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राणा जगजितसिंह पाटील यांच्याशी सामना होत आहे.

राणा जगजितसिंह हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत, तर त्यांचे वडील डॉ .पद्मसिंह पाटील हे अनेक वर्षे मंत्री राहिलेले आहेत. शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे देखील या अगोदर शिवसेनेकडून आमदार राहिले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढत उस्मानाबादमध्ये पाहायला  मिळणार आहे. युतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे ही सभा घेत आहेत. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, रिपाई नेते रामदास आठवले, रासपा नेते महादेव जानकर अशी अनेक नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.

बीड, बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या जागांसाठी 18 तारखेला मतदान होणार आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.