प्रकाशाचा जागर! आज रात्री 9 वाजता 9 मिनिटं दिवे बंद करुन मेणबत्ती-पणती उजळवा, काय काळजी घ्याल?

5 एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटं घरातील सर्व दिवे बंद करा आणि बाल्कनीत उभे राहून मेणबत्ती, पणती-दिवा, मोबाईल लाईट किंवा टॉर्च लावा. (PM Narendra Modi appeals Lighting Candle to show Fight against Corona)

प्रकाशाचा जागर! आज रात्री 9 वाजता 9 मिनिटं दिवे बंद करुन मेणबत्ती-पणती उजळवा, काय काळजी घ्याल?

मुंबई : आज (रविवार 5 एप्रिल) रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरातील दिवे बंद करा आणि मेणबत्ती-पणती उजळवा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे. यावेळी घरातील बाल्कनी किंवा खिडकीतच थांबा, रस्त्यावर एकत्र जमू नका, अशा स्पष्ट सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत. (PM Narendra Modi appeals Lighting Candle to show Fight against Corona)

कोरोनाग्रस्त बांधवांना आपल्याला प्रकाशाच्या वाटेवर न्यायचं आहे. त्यासाठी या रविवारी प्रकाशाची ताकद दाखवायची आहे. 5 एप्रिलला रात्री 9 वाजता मला तुमची 9 मिनिटं द्या, घरातील सर्व दिवे बंद करा आणि बाल्कनीत उभे राहून 9 मिनिट मेणबत्ती, पणती-दिवा, मोबाईल लाईट किंवा टॉर्च लावा. त्यासाठी कोणालाही कुठेही एकत्र जमायचं नाही, रस्ते, गल्ली इथे जायचं नाही, सोशल डिस्टन्सिंगची लक्ष्मणरेषा पार करायची नाही, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केलं.

9 मिनिटांनंतर एकेक दिवा लावताना प्रकाशाची शक्ती दिसेल. दिवे लावताना आपण एकटे नाही, असा संकल्प करा. आपण 130 कोटी जनतेची शक्ती दाखवून देऊ, कोरोनाच्या अंधकारमय संकटावर प्रकाशाने मात करु, असं मोदी म्हणाले होते.

मेणबत्ती-पणती उजळवताना काय काळजी घ्यावी?

1. घरातील फक्त दिवे बंद करा, पंखा, फ्रीज, टीव्ही आणि तत्सम इलेक्ट्रॉनिक उपकरणे सुरुच ठेवा
2. घराचा मेन स्वीच बंद करु नका, फक्त सर्व खोल्यांमधील दिवे मालवा
3. फक्त 9 मिनिटांसाठी दिवे बंद ठेवायचे आहेत, त्यानंतर एक-एक करुन दिवे सुरु करा
4. रहिवासी भागातील दिवे बंद करायचे आहेत, रुग्णालय किंवा रस्त्यावरील दिवे बंद करु नयेत
5. घराच्या खिडकी, बाल्कनी किंवा अंगणात दिवे लावा, गल्ली, सोसायटी किंवा रस्त्यावर येऊ नका
6. दिवे लावताना घरातही एकत्र जमून गर्दी करु नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा
7. मेणबत्ती, पणती, दिवा याचा आग्रह नको, मोबाईल लाईट किंवा टॉर्च लावल्यासही चालेल
8. दिवे लावताना हात कोरडे ठेवा, अल्कोहोलयुक्त sanitizer लावू नये,
9. लहान दिवे लावा, मशाल किंवा होळी पेटवू नका
10. दिवे लावताना लहान मुलांना शक्यतो दूर ठेवा, अंधारात अपघात होणार नाही, याची काळजी घ्या

(PM Narendra Modi appeals Lighting Candle to show Fight against Corona)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *