ट्रॅक्टरद्वारे गावात सॅनिटायझरची फवारणी, पंतप्रधानांकडून नाशिकच्या शेतकऱ्याचं कौतुक

महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील सटाण्याचे शेतकरी राजेंद्र जाधव यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे (PM Narendra Modi appreciate social work of Nashik farmer).

ट्रॅक्टरद्वारे गावात सॅनिटायझरची फवारणी, पंतप्रधानांकडून नाशिकच्या शेतकऱ्याचं कौतुक
Follow us
| Updated on: May 31, 2020 | 3:30 PM

नवी दिल्ली : कोरोनाविरोधाच्या लढाईत अनेक सर्वसामान्य नागरिक जनतेची सेवा करत आहे. ते स्वत:हून जनतेच्या सेवेसाठी पुढे आले आहेत. अशा नागरिकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं. यामध्ये महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील सटाण्याचे शेतकरी राजेंद्र जाधव यांचंदेखील कौतुक पंतप्रधान मोदीनं केलं (PM Narendra Modi appreciate social work of Nashik farmer).

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 11 वाजता देशातील जनतेला रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे संबोधित केलं. यावेळी त्यांनी राजेंद्र जाधव यांच्या कामांचं कौतुक केलं. राजेंद्र जाधव यांनी आपल्या ट्रॅक्टरला सॅनिटायझर मशीन बसवलं आहे. या मशीनद्वारे ते संपूर्ण गावात सॅनिटायझरची फवारणी करतात. त्यांच्या याच कामाची दखल पंतप्रधान मोदी यांनी घेतली (PM Narendra Modi appreciate social work of Nashik farmer).

“देशभरातील छोट्या गावांपासून शहरांपर्यंत, छोट्या ते मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत, लॅब, कोरोनाविरोधाच्या लढाईत नव्या पद्धतीने लढत आहेत. नवे संशोधन करत आहेत. नाशिकचे राजेंद्र जाधव यांचं उदाहरण आवर्जून घ्यावसं वाटतं. राजेंद्र नाशिकच्या सटाणा गावाचे शेतकरी आहेत. त्यांनी आपल्या गावाला कोरोनापासून वाचवण्यासाठी त्यांच्या ट्रॅक्टरला एक सॅनेटायझर मशीन बसवलं आहे. या मशीनद्वारे ते संपूर्ण गावात सॅनिटायझरची फवारणी करतात. हे मशीन खूप प्रभावितपणे काम करत आहे”, असं मोदी म्हणाले.

“‘सेवा परमो धर्म’, असं आपल्याकडे म्हटलं जातं. सेवेतच सुख आहे. दुसऱ्याच्या सेवेत लागलेल्या व्यक्तीत कोणत्याही प्रकारचे नैराश्य किंवा यातना नसते. अशा व्यक्तीच्या जीवनात आणि त्याच्या दृष्टीकोनात नेहमी आत्मविश्वास दिसतो. या व्यक्तीमध्ये नेहमी सकारात्मकता दिसते. आपले डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, सफाईकामगार, मीडिया कर्मचारी हे सर्व सेवा करत आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

मुलीच्या शिक्षणाचे पैसे समाजसेवेसाठी खर्च करणाऱ्या सी. मोहन यांचं कौतुक

“सेवामध्ये आपलं सगळं समर्पित करणाऱ्या लोकांची संख्या अगणित आहे. असेच एक तमिळनाडूचे सी. मोहन नावाचे सज्जन गृहस्थ आहेत. सी मोहनजी एक सलून चालवतात. मेहनतीच्या कमाईने त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी 5 लाख रुपये वाचवून ठेवले होते. त्यांनी ती सर्व रक्कम गरिब आणि होतकरु नागरिकांसाठी खर्च केली”, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.

3 हजार मास्क वाटणाऱ्या दिव्यांग राजूचं कौतुक

“पंजाबचे पठाणकोट येथे देखील असंच एक उदाहरण मला माहिती पडलं. तिथे दिव्यांग राजूने दुसऱ्याच्या मदतीने मिळालेल्या पैशांमध्ये 3 हजार मास्क बनवून वाटले. जवळपास 100 परिवारांना त्याने रेशनदेखील पुरवलं. अशाचप्रकारे ठेला लावून आपला उदरनिर्वाह भागवणारे गौतम दास दररोज सध्या गरजूंसाठी जेवणाची व्यवस्था करत आहेत”, असं मोदींनी सांगितलं.

“देशभरातील विविध गावांमध्ये हजारो महिला मास्क बनवत आहेत. अनेक सामाजिक संस्था त्यांना या कामात मदत करत आहेत. असे कित्येक उदाहरण दररोज दिसत आहेत. ते नमो अॅपद्वारे आपले अनुभव शेअर करत आहे. मी बऱ्याचदा अनेकांचं नाव घेऊ शकत नाही. पण मी सर्वांचा आदर करतो”, असं मोदी म्हणाले.

संबंधित बातमी :

देशवासीयांची सेवाशक्ती ही आपली खरी ताकद : पंतप्रधान मोदी

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.