Ayodhya Ram Mandir Bhoomipoojan | पारिजातकाचे वृक्षारोपण, 12.44 च्या मुहूर्तावर भूमिपूजन, पंतप्रधान मोदींचा दिवसभरातील कार्यक्रम काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नृत्यगोपालदास हे पाच मान्यवर मंचावर असतील.

Ayodhya Ram Mandir Bhoomipoojan | पारिजातकाचे वृक्षारोपण, 12.44 च्या मुहूर्तावर भूमिपूजन, पंतप्रधान मोदींचा दिवसभरातील कार्यक्रम काय?
Follow us
| Updated on: Aug 05, 2020 | 7:27 AM

लखनौ : अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजनाच ऐतिहासिक सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. अयोध्येला दिवाळीचे स्वरुप आले असून आज (बुधवार 5 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 12 वाजून 44 मिनिटांच्या मुहूर्तावर भूमिपूजन होणार आहे. (PM Narendra Modi Ayodhya Ram Mandir Bhoomipoojan Program)

पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 9.35 वाजता दिल्लीहून अयोध्येला रवाना होतील. साधारण 11.30 वाजता अयोध्या साकेत कॉलेज हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर हनुमानगढी येथे पोहोचून ते दर्शन आणि पूजा करतील. त्यानंतर रामलल्ला विराजमान यांचे दर्शन घेतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची श्रीराम मंदिर भूमिपूजन कार्यक्रम पत्रिका

सकाळी 9.35 वा. – दिल्लीतून प्रस्थान सकाळी 10.35 वा. – लखनौ विमानतळावर आगमन सकाळी 10.40 वा. – हेलिकॉप्टरने अयोध्येकडे प्रस्थान सकाळी 11.30 वा. – अयोध्या साकेत कॉलेज हेलिपॅडवर आगमन सकाळी 11.40 वा. – हनुमानगढी येथे पोहोचून दर्शन आणि पूजा दुपारी 12.00 वा. – राम जन्मभूमी परिसरात आगमन, रामलल्ला विराजमान यांचे दर्शन (PM Narendra Modi Ayodhya Ram Mandir Bhoomipoojan Program) दुपारी 12.15 वा. – राम जन्मभूमी परिसरात पारिजातकाचे वृक्षारोपण दुपारी 12.44 वा. – श्रीराम मंदिर भूमिपूजन दुपारी 12.45 नंतर – पंतप्रधान जवळपास तासभर भक्तांना संबोधित करणार  दुपारी 02.05 वा. – साकेत कॉलेज हेलिपॅडकडे प्रस्थान दुपारी 02.20 वा. – हेलिकॉप्टरने लखनौकडे प्रस्थान, लखनौहून दिल्लीसाठी प्रस्थान

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मंचावर पाच मान्यवरांना स्थान असेल. मोदींसह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नृत्यगोपालदास हे मंचावर असतील.

अयोध्या भूमिपूजन सोहळ्याच्या ताज्या बातम्या इथे वाचा

भूमिपूजनासाठी 175 जणांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. सर्व आमंत्रित व्यक्तींनी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत भूमिपूजन प्रांगणात येणे बंधनकारक आहे. त्यानंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.

(PM Narendra Modi Ayodhya Ram Mandir Bhoomipoojan Program)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.