मला जेवढ्या शिव्या द्यायच्यात द्या, प्रामाणिकपणे काम करत राहणार : मोदी

नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राईक ही एक मोठी रिस्क होती, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. नव्या वर्षात पहिल्यांदाच दिलेल्या मुलाखतीत मोदींनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. राम मंदिर हे घटनेनुसारच तयार होईल. न्याय प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय अध्यादेश येणार नाही, असं मोदींनी स्पष्ट केलंय. वृत्तसंस्था एएनआयला मोदींनी ही मुलाखत दिली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांवर मोदी काय […]

मला जेवढ्या शिव्या द्यायच्यात द्या, प्रामाणिकपणे काम करत राहणार : मोदी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राईक ही एक मोठी रिस्क होती, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. नव्या वर्षात पहिल्यांदाच दिलेल्या मुलाखतीत मोदींनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. राम मंदिर हे घटनेनुसारच तयार होईल. न्याय प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय अध्यादेश येणार नाही, असं मोदींनी स्पष्ट केलंय. वृत्तसंस्था एएनआयला मोदींनी ही मुलाखत दिली आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांवर मोदी काय म्हणाले?

छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपचा दारुण पराभव झालाय. यावरही मोदींनी प्रतिक्रिया दिली. छत्तीगडमध्ये झालेल्या पराभव मान्य आहे, पण मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये गेल्या 15 वर्षांपासून सत्ता असल्यामुळे अँटी इनकम्बसीचा फटका बसला, असं मोदी म्हणाले. तेलंगणा आणि मिझोराम या राज्यात सत्ता येईल, अशी अपेक्षाही नव्हती, असं स्पष्टीकरण मोदींनी दिलं.

मोदी लाट ओसरली असल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. यावरही मोदींनी भाष्य केलं.  2013 मध्ये जे लोक म्हणायचे की मोदी जिंकू शकत नाही, त्याच लोकांनी मोदी लाट असल्याचं मान्य केलं. लाट ही फक्त जनतेच्या विश्वासावर असते, आज भारतात विश्वास दिसून येतोय, तरुणांच्या आशा वाढल्यात, असं मोदी म्हणाले.

महाआघाडीवर मोदींचा निशाणा

आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होणार असल्याचा दावा केला जात आहे. पण भाजपच्या जागा कमी होतील असा अंदाज नाही लावला तर विरोधकांच्या महाआघाडीत पक्ष येतील कसे? स्वतःला वाचवण्यासाठी हे बोलावं लागतं, 2014 मध्येही हेच लॉजिक लावलं जात होतं, असं म्हणत मोदींनी काँग्रेसप्रणित विरोधकांच्या महाआघाडीवर टीकास्त्र सोडलं.

“अगोदर विकेंद्रीकृत भ्रष्टाचार व्हायचा, जे राज्यात आहेत, ते राज्यात भ्रष्टाचार करायचे आणि केंद्रातले केंद्रात भ्रष्टाचार करायचे, आता महाआघाडीच्या रुपाने सगळे एकत्र येत आहेत. महाआघाडी नेमकी कशासाठी बनत आहे? त्यांनी एकमुखाने देशातला मुद्दा कधी उचललाय का? सर्व जण स्वतःला वाचवण्यासाठी एकत्र येत आहेत, मोदी विरोध हाच मुद्दा आहे, असं मोदी म्हणाले.

परदेश दौऱ्यांवर स्पष्टीकरण

मोदींचे परदेश दौरे सतत चर्चेत असतात. यावरही मोदींना प्रश्न विचारण्यात आला. “जगात समिट अनेक वाढल्यात आणि त्यासाठी जाणं अनिवार्य बनलंय, सर्व पंतप्रधानांना कमी अधिक फरकाने एवढेच परदेश दौरे करावे लागतात, माझ्यात फरक एवढाच की, मी गेल्यानंतर शेजारच्या एक-दोन देशांना भेटून येतो, ज्यामुळे खर्च वाचतो”, असं स्पष्टीकरण मोदींनी दिलं.

सर्जिकल स्ट्राईकचा थरार

उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय कसा घेतला याबद्दल सर्व माहिती मोदींनी दिली. यावरुन जे राजकारण करण्यात आलं, तेही दुर्दैवी असल्याचं मोदी म्हणाले. “सर्जिकल स्ट्राईकची माहिती सर्वात अगोदर सैन्याने दिली, एकही मंत्री यावर बोलला नाही. पण त्याच दिवशी राजकीय पक्षाच्या काही नेत्यांनी सर्जिकल स्ट्राईकवर आक्षेप घेतला, जो आरोप पाकिस्तानने केला, त्याला आपलेच लोक समर्थन देत होते”, असं मोदी म्हणाले.

उरी हल्ल्यात जवान मारण्यात आले, त्याने अस्वस्थ केलं, माझ्या वैयक्तिक रागाचा व्यवस्थेवर परिणाम होऊ नये याचीही काळजी घेत होतो, माझ्यापेक्षा जास्त रोष सैन्यामध्ये होता, शहिदांना न्याय देण्याची त्यांची इच्छा होती, यानंतर सैन्याला फ्री हँड दिले, अशी माहिती मोदींनी दिली.

सैन्य आपल्या शब्दावर जीव पणाला लावतात, सर्जिकल स्ट्राईकवर नियोजन केलं, स्पेशल ट्रेनिंग दिली, मी स्वतः लक्ष ठेवलं. कारण, हा सर्व अनुभव माझ्यासाठीही नवीन होता. दोन वेळा तारखा बदलल्या. सर्व तयारीनंतर तारीख निश्चित केली, सूर्योदयापूर्वी आपले लोक परत येतील हे ठरलं, यश मिळो किंवा अपयश, सूर्योदयापूर्वी परत या स्पष्ट आदेश दिला. सूर्योदय होऊनही काही माहिती मिळत नसल्याने अस्वस्थ झालो, एक तासानंतर बातमी आली की सैन्य आपल्या सीमेत आलेलं नाही, पण सेफ झोनमध्ये आहोत, तरीही अखेरचा व्यक्ती येईपर्यंत मला माहिती द्या असं सांगितलं, असं मोदी म्हणाले.

हे सर्व झाल्यानंतर सर्जिकल स्ट्राईकची माहिती पाकिस्तानलाही दिली, हा क्षण माझ्यासाठीही महत्त्वाचा होता, या घटनेने सैन्याच्या शक्तीचा नवा परिचय झाला. आपल्या सैन्याची शक्ती अद्भुत असल्याचं मोदी म्हणाले.

पाकिस्तान संबंध

सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती चालूच असतात. भारताकडून संवादाचा मार्ग अवलंबला जातो, पण पाकिस्तानकडून कुरघोड्या केल्या जातात. यावरही मोदींनी भाष्य केलं. यूपीए असो किंवा एनडीए, भारताच्या कोणत्याही सरकारने पाकिस्तानसोबत संवादाला विरोध नाही केला, हे आपलं धोरणच आहे की प्रत्येक धोरणावर चर्चा झाली पाहिजे, असं मोदी म्हणाले. शिवाय पाकिस्तान एका लढाईने सुधारणारा देश नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

सरकारी संस्थांचा वाद आणि राफेल प्रकरण

राफेल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे जास्त बोलण्याची गरज नसल्याचं मोदी म्हणाले. आपण स्वतः अनेकवेळा संसदेत आणि सभांमध्येही याबाबत स्पष्टीकरण दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्याच्याकडून हा आरोप केला जातोय, त्यांनी तो सिद्ध करुन दाखवावा, असं खुलं आव्हान मोदींनी दिलं. मला जेवढ्या शिव्या द्यायच्यात देऊ द्या, पण मी सैन्यासाठी लागेल ते करणार, प्रामाणिकपणे व्यवहार करेन, खोट्या आरोपांच्या भीतीने जे आवश्यक आहे त्यापासून दूर पळणार नाही, असं मोदी म्हणाले.

स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत फक्त संरक्षण व्यवहारच वादात का? हे व्यवहार दलालांशिवाय होऊ शकत नव्हते का? माझा गुन्हा हा आहे की मी मेक इन इंडियाचा प्रयत्न करतो, बाहेरचा व्यवहार बंद होतोय, असं मोदींनी सांगितलं. एखादा परदेशी आरोपी भारताच्या ताब्यात मिळतो याचा आपल्याला अभिमान पाहिजे, पण काँग्रेसचा वकील त्याला वाचवण्यासाठी येतो, हा चिंतेचा विषय आहे, असंही मोदींनी सांगितलं.

सरकारी संस्था, विशेषतः ईडी आणि सीबीआय याबद्दल मोदी सरकारला धारेवर धरं जातं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाप्रकरणीही सरकारवर मोठी टीका करण्यात आली. यावरही मोदींनी स्पष्टीकरण दिलं. “एका पक्षाचा नेता (राहुल गांधी) कॅबिनेटचा अध्यादेश पत्रकार परिषदेत फाडतो, न्यायमूर्तींच्या नियुक्तीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप केला, अनेक आरबीआय गव्हर्नरला कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदरच हटवलं आणि आज सरकारी संस्थांमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप केला जातो,” असं मोदी म्हणाले.

“राम मंदिरावर अध्यादेश तूर्तास नाही”

राम मंदिर बांधण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहणार असल्याचं मोदींनी स्पष्ट केलं. न्याय प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत अध्यादेश काढणार नसल्याचं ते म्हणाले. देशाच्या शांततेसाठी काँग्रेसला विनंती करतो, त्यांच्या वकिलांनी राम मंदिर प्रकरणी कोर्टात अडथळा आणू नये, लवकरात लवकर न्याय प्रक्रिया पूर्ण होण्याची गरज आहे, असं मोदी म्हणाले.

शेतकरी कर्जमाफी आणि काँग्रेस

ज्या राज्यांना कर्जमाफी करायची आहे, त्यांना आम्ही रोखलं नाही, पण शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं मोदी म्हणाले. स्वामिनाथन आयोगाची शिफारस 2007 मध्येच स्वीकारली असती, तर परिस्थिती आतापर्यंत चांगली झाली असती, कर्जमाफीचा फायदा सर्वांना होत नाही, अनेक शेतकरी सावकारांकडून कर्ज घेतात, ज्यामुळे कर्जमाफीचा फायदा होत नाही, असंही ते म्हणाले.

2008 मध्येही निवडणूक जिंकण्यासाठी कर्जमाफी केली होती, निवडणूक आणि कर्जमाफी समीकरणं बनलंय. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणं ही काळाची गरज आहे, त्यावर काम सुरुय. खोटं बोलणं आणि भ्रमित करणं याला मी लॉलीपॉप म्हणालो, बँकांना चुना लावून जे पळून गेले, त्यांच्याकडून वसुली सुरु केली, पण हा मुद्दा घेऊन शेतकऱ्यांना भ्रमित करणं जबाबदार राजकीय पक्षाने करु नये, असं आवाहन मोदींनी केलं.

“नोटाबंदी हा झटका नव्हता”

नोटाबंदीमुळे गाठोडे बांधून पडलेल्या नोटा बँकेत आल्या, कर भरणारांची संख्या वाढली, बँकेच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली, जीडीपीच्या तुलनेत चलन कमी झालंय हे चांगले संकेत आहेत, अन्यथा आता नोटांचे ढीग पाहायला मिळाले असते, असं उत्तर मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयावर दिलंय. नोटाबंदी झटका नव्हता, काळा पैसा भरा हे आम्ही ओरडून सांगत होतो, दंड भरुन सूट मिळत होती, एक वर्षभर ही प्रक्रिया सुरु होती, त्यानंतरच हे करावं लागलं, देशाच्या आर्थिक आरोग्यासाठी नोटाबंदी करणं गरजेचं होतं, असं ते म्हणाले.

दरम्यान, बँकांना चुना लावून पळून गेलेल्या उद्योगपतींना सोडणार नसल्याचंही मोदी म्हणाले. ज्यांनी चार पिढ्या देशावर राज्य केलं ते आज जामिनावर बाहेर आहेत, तेही आर्थिक प्रकरणात, भाजपचा कुणी विरोधी आहे म्हणून त्याला त्रास व्हावा या मताचे आम्ही नाही. जे होईल ते कायद्यानेच, असं मोदींनी सांगितलं.

मी पहिल्याच जी-20 समिटमध्ये काळ्या पैशाचा मुद्दा उपस्थित केला, आज सगळे देश काळ्या पैशाची माहिती द्यायला तयार आहेत, भारताने अनेक देशांसोबत यासाठी करार केले आहेत, काळा पैसा भारतात परत येईल, याबाबत मोदींनी आश्वस्त केलं.

या अगोदर देशातून पळालेलं कुणीही परत आलं नाही, या सरकारच्या काळात पळून गेलेले सर्व परत येतील, देशाचा एक रुपयाही व्यर्थ जाऊ देणार नाही. अगोदरच्यासारखं सरकार असतं तर आर्थिक घोटाळे करणारांना पळावं लागलं नसतं, इथे कायदा आहे म्हणून पळून गेलेत, जे पळाले त्यांना भारतात आणू, अनेक कायदे सरकारने बनवलेत, असं मोदी म्हणाले.

“जीएसटी आणखी सोपी बनवण्यासाठी प्रयत्न सुरु”

भारतासारख्या मोठ्या देशात अंमलबजावणीसाठी अडचणी येऊ शकतात, असं मोदींनी मान्य केलं. जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे छोट्या व्यापाऱ्यांना त्रास झाल्याचंही त्यांनी कबूल केलं. पण जीएसटीच्या नावावर जे राजकारण केलं जातंय, त्याबद्दल मोदींनी नाराजी व्यक्त केली.

“प्रणव मुखर्जी अर्थमंत्री होते तेव्हापासून जीएसटीची प्रक्रिया सुरु होती, जीएसटी येण्यापूर्वी देशात कर काय होते? तेही समोर यायला हवं, देशात 30 ते 40 टक्के कर असणाऱ्या वस्तू होत्या, लोकांना कळतही नव्हतं, आज 500 पेक्षा जास्त वस्तूंवर 0 टक्के कर आहे. जीएसटीबाबत सर्व निर्णय झाले, त्यात काँग्रेसचाही समावेश आहे. जीएसटी कौन्सिलमध्ये काँग्रेसशासित राज्यही आहेत, त्यात सर्वांना समान अधिकार आहेत. फक्त राजकारण करणं चुकीचं आहे, जीएसटी एक नवी व्यवस्था आहे,” असं मोदी म्हणाले.

मध्यमवर्गीयांना घर घेण्यासाठी मदत देण्याची योजना सुरु केली, या वर्गासाठी पाच ते सहा लाख रुपयांची मदत मिळणं मोठी गोष्ट आहे. रेल्वेच्या एसी कोचपेक्षा जास्त लोक आज विमान प्रवास करतात, मध्यमवर्गीयांना हे सगळं विविध योजनांमुळे शक्य झालंय. महागाई दर जो 18 टक्क्यांवर होता, तो आम्ही 2 ते 3 टक्क्यांवर आणलाय, मध्यमवर्गीयांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो, या अडचणी येऊ नयेत यासाठीच प्रयत्न सुरु आहेत, असं मोदी म्हणाले.

देश चालवण्यात सर्वात मोठा वाटा मध्यमवर्गीयांचा आहे, त्यामुळे या वर्गाची चिंता करणं हे आमचं कर्तव्य आहे. निर्माणाधीन इमारती आणि तयार इमारती यांच्यासाठीचा कर 5 टक्क्यांवर आणू, अनेक गोष्टींवर प्रयत्न सुरु आहेत, असं आश्वासन मोदींनी दिलं.

भाजपमध्ये कुणाचं चालतं?

भाजपने ज्या वेगाने विकास केलाय, ते कुणीही नाकारु शकत नाही. भाजपने आसाम, हरियाणा, त्रिपुरा अनेक राज्यात विजय मिळवलाय, 2019 मध्ये जनतेचा ज्यांच्यावर विश्वास आहे, ते आम्ही आहोत. भाजपमध्ये मोदी-शाहांचंच चालतं असा आरोप करणारांनी भाजपला समजून घेतलेलं नाही, हा पक्ष वाढवण्यासाठी आमचे कार्यकर्ते रात्रंदिवस मेहनत करतात, हा एका व्यक्तीचा पक्ष होऊ शकत नाही, असंही मोदींनी स्पष्ट केलं. शिवाय काँग्रेस हे जातीवाद, भ्रष्टाचार यांची एक संस्कृती आहे. मी काँग्रेसमुक्त भारताचा नारा देतो, तेव्हा या संस्कृतीचा नायनाट करण्याचा नारा देतो, काँग्रेसलाही ही संस्कृती सोडावी लागेल, असं ते म्हणाले.

संपूर्ण मुलाखत

लाईव्ह अपडेट्स

जगात समिट अनेक वाढल्यात आणि त्यासाठी जाणं अनिवार्य बनलंय, सर्व पंतप्रधानांना कमी अधिक फरकाने एवढेच परदेश दौरे करावे लागतात, माझ्यात फरक एवढाच की, मी गेल्यानंतर शेजारच्या एक-दोन देशांना भेटून येतो, ज्यामुळे खर्च वाचतो – मोदी

यूपीए असो किंवा एनडीए, भारताच्या कोणत्याही सरकारने पाकिस्तानसोबत संवादाला विरोध नाही केला, हे आपलं धोरणच आहे की प्रत्येक धोरणावर चर्चा झाली पाहिजे – मोदी

सर्जिकल स्ट्राईकची माहिती पाकिस्तानलाही दिली, या क्षण माझ्यासाठीही महत्त्वाचा होता, या घटनेने सैन्याच्या शक्तीचा नवा परिचय झाला – मोदी

सूर्योदय होऊनही काही माहिती मिळत नसल्याने अस्वस्थ झालो, एक तासानंतर बातमी आली की सैन्य आपल्या सीमेत आलेलं नाही, पण सेफ झोनमध्ये आहोत, तरीही अखेरचा व्यक्ती येईपर्यंत मला माहिती द्या असं सांगितलं – मोदी

सैन्य आपल्या शब्दावर जीव पणाला लावतात, सर्जिकल स्ट्राईकवर नियोजन केलं, स्पेशल ट्रेनिंग दिली, मी स्वतः लक्ष ठेवलं, सर्व तयारीनंतर तारीख निश्चित केली, सूर्योदयापूर्वी आपले लोक परत येतील हे ठरलं, यश मिळो किंवा अपयश, सूर्योदयापूर्वी परत या स्पष्ट आदेश दिला – मोदी

उरी हल्ल्यात जवान मारण्यात आले, त्याने अस्वस्थ केलं, माझ्या वैयक्तिक रागाचा व्यवस्थेवर परिणाम होऊ नये याचीही काळजी घेत होतो, माझ्यापेक्षा जास्त रोष सैन्यामध्ये होता, शहिदांना न्याय देण्याची त्यांची इच्छा होती, यानंतर सैन्याला फ्री हँड दिले – मोदी

सैन्याचा गौरव करणंही महत्त्वाचं असतं. पण याचं राजकारण होऊ नये, आम्ही सैनिकांचा गौरव केला त्याला राजकारण म्हटलं जातंय – मोदी

सर्जिकल स्ट्राईकची माहिती सर्वात अगोदर सैन्याने दिली, एकही मंत्री यावर बोलला नाही. पण त्याच दिवशी राजकीय पक्षाच्या काही नेत्यांनी सर्जिकल स्ट्राईकवर आक्षेप घेतला, जो आरोप पाकिस्तानने केला, त्याला आपलेच लोक समर्थन देत होते – मोदी

मला जेवढ्या शिव्या द्यायच्यात देऊ द्या, पण मी सैन्यासाठी लागेल ते करणार, प्रामाणिकपणे व्यवहार करेन, खोट्या आरोपांच्या भीतीने जे आवश्यक आहे त्यापासून दूर पळणार नाही – मोदी

स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत फक्त संरक्षण व्यवहारच वादात का? हे व्यवहार दलालांशिवाय होऊ शकत नव्हते का? माझा गुन्हा हा आहे की मी मेक इन इंडियाचा प्रयत्न करतो, बाहेरचा व्यवहार बंद होतोय – मोदी

एखादा परदेशी आरोपी भारताच्या ताब्यात मिळतो याचा आपल्याला अभिमान पाहिजे, पण काँग्रेसचा वकील त्याला वाचवण्यासाठी येतो, हा चिंतेचा विषय आहे – मोदी

एका पक्षाचा नेता (राहुल गांधी) कॅबिनेटचा अध्यादेश पत्रकार परिषदेत फाडतो, न्यायमूर्तींच्या नियुक्तीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप केला, अनेक आरबीआय गव्हर्नरला कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदरच हटवलं आणि आज सरकारी संस्थांमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप केला जातो – मोदी

अगोदर विकेंद्रीकृत भ्रष्टाचार व्हायचा, जे राज्यात आहेत, ते राज्यात भ्रष्टाचार करायचे आणि केंद्रातले केंद्रात भ्रष्टाचार करायचे, आता महाआघाडीच्या रुपाने सगळे एकत्र येत आहेत – मोदी

महाआघाडी नेमकी कशासाठी बनत आहे? त्यांनी एकमुखाने देशातला मुद्दा कधी उचललाय का? सर्व जण स्वतःला वाचवण्यासाठी एकत्र येत आहेत, मोदी विरोध हाच मुद्दा आहे – मोदी

मॉब लिंचिंगच्या घटना निषेधार्ह आहेत. ही परिस्थिती सुधारण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज, एखाद्या योजनेचा लाभ देतो तेव्हा विशिष्ट समाज कोणत्या जातीचा हे आम्ही विचारत नाही – मोदी

देशाच्या शांततेसाठी काँग्रेसला विनंती करतो, त्यांच्या वकिलांनी राम मंदिर प्रकरणी कोर्टात अडथळा आणू नये, लवकरात लवकर न्याय प्रक्रिया पूर्ण होण्याची गरज – मोदी

ज्या राज्यांना कर्जमाफी करायची आहे, त्यांना आम्ही रोखलं नाही, पण शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत – मोदी

स्वामिनाथन आयोगाची शिफारस 2007 मध्येच स्वीकारली असती, तर परिस्थिती आतापर्यंत चांगली झाली असती, कर्जमाफीचा फायदा सर्वांना होत नाही, अनेक शेतकरी सावकारांकडून कर्ज घेतता, ज्यामुळे कर्जमाफीचा फायदा होत नाही – मोदी

2008 मध्येही निवडणूक जिंकण्यासाठी कर्जमाफी केली होती, निवडणूक आणि कर्जमाफी समीकरणं बनलंय. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणं ही काळाची गरज आहे, त्यावर काम सुरुय – मोदी

खोटं बोलणं आणि भ्रमित करणं याला मी लॉलीपॉप म्हणालो, बँकांना चुना लावून जे पळून गेले, त्यांच्याकडून वसुली सुरु केली, पण हा मुद्दा घेऊन शेतकऱ्यांना भ्रमित करणं जबाबदार राजकीय पक्षाने करु नये – मोदी

मध्यमवर्गीयांना घर घेण्यासाठी मदत देण्याची योजना सुरु केली, या वर्गासाठी पाच ते सहा लाख रुपयांची मदत मिळणं मोठी गोष्ट आहे – मोदी

रेल्वेच्या एसी कोचपेक्षा जास्त लोक आज विमान प्रवास करतात, मध्यमवर्गीयांना हे सगळं विविध योजनांमुळे शक्य झालंय – मोदी

महागाई दर जो 18 टक्क्यांवर होता, तो आम्ही 2 ते 3 टक्क्यांवर आणलाय, मध्यमवर्गीयांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो, या अडचणी येऊ नयेत यासाठीच प्रयत्न सुरु आहेत – मोदी

देश चालवण्यात सर्वात मोठा वाटा मध्यमवर्गीयांचा आहे, त्यामुळे या वर्गाची चिंता करणं हे आमचं कर्तव्य आहे – मोदी

निर्माणाधीन इमारती आणि तयार इमारती यांच्यासाठीचा कर 5 टक्क्यांवर आणू, अनेक गोष्टींवर प्रयत्न सुरु आहेत – मोदी

जीएसटीमुळे छोट्या व्यापाऱ्यांना त्रास झालाय, त्यांच्या समस्या समजून घेणं आमचं काम आहे, या समस्यांवर जीएसटी कौन्सिलमध्ये निर्णय घेतला जातो – मोदी

जीएसटीबाबत सर्व निर्णय झाले, त्यात काँग्रेसचाही समावेश आहे. जीएसटी कौन्सिलमध्ये काँग्रेसशासित राज्यही आहेत, त्यात सर्वांना समान अधिकार आहेत. फक्त राजकारण करणं चुकीचं आहे, जीएसटी एक नवी व्यवस्था आहे – मोदी

प्रणव मुखर्जी अर्थमंत्री होते तेव्हापासून जीएसटीची प्रक्रिया सुरु होती, जीएसटी येण्यापूर्वी देशात कर काय होते? तेही समोर यायला हवं, देशात 30 ते 40 टक्के कर असणाऱ्या वस्तू होत्या, लोकांना कळतही नव्हतं, आज 500 पेक्षा जास्त वस्तूंवर 0 टक्के कर आहे – मोदी

ज्यांनी चार पिढ्या देशावर राज्य केलं ते आज जामिनावर बाहेर आहेत, तेही आर्थिक प्रकरणात, भाजपचा कुणी विरोधी आहे म्हणून त्याला त्रास व्हावा या मताचे आम्ही नाही. जे होईल ते कायद्यानेच – मोदी

मी पहिल्याच जी-20 समिटमध्ये काळ्या पैशाचा मुद्दा उपस्थित केला, आज सगळे देश काळ्या पैशाची माहिती द्यायला तयार आहेत, भारताने अनेक देशांसोबत यासाठी करार केले आहेत, काळा पैसा भारतात परत येणारच – मोदी

या अगोदर देशातून पळालेलं कुणीही परत आलं नाही, या सरकारच्या काळात पळून गेलेले सर्व परत येतील, देशाचा एक रुपयाही व्यर्थ जाऊ देणार नाही – मोदी

अगोदरच्यासारखं सरकार असतं तर आर्थिक घोटाळे करणारांना पळावं लागलं नसतं, इथे कायदा आहे म्हणून पळून गेलेत, जे पळाले त्यांना भारतात आणू, अनेक कायदे सरकारने बनवलेत – मोदी

नोटाबंदी झटका नव्हता, काळा पैसा भरा हे आम्ही ओरडून सांगत होतो, दंड भरुन सूट मिळत होती, एक वर्षभर ही प्रक्रिया सुरु होती, त्यानंतरच हे करावं लागलं, देशाच्या आर्थिक आरोग्यासाठी नोटाबंदी करणं गरजेचं होतं – मोदी

नोटाबंदीमुळे गाठोडे बांधून पडलेल्या नोटा बँकेत आल्या, कर भरणारांची संख्या वाढली, बँकेच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली, जीडीपीच्या तुलनेत चलन कमी झालंय हे चांगले संकेत आहेत, अन्यथा आता नोटांचे ढीग पाहायला मिळाले असते – मोदी

भाजपने ज्या वेगाने विकास केलाय, ते कुणीही नाकारु शकत नाही. भाजपने आसाम, हरियाणा, त्रिपुरा अनेक राज्यात विजय मिळवलाय, 2019 मध्ये जनतेचा ज्यांच्यावर विश्वास आहे, ते आम्ही आहोत – मोदी

भाजपमध्ये मोदी-शाहांचंच चालतं असा आरोप करणारांनी भाजपला समजून घेतलेलं नाही, हा पक्ष वाढवण्यासाठी आमचे कार्यकर्ते रात्रंदिवस मेहनत करतात, हा एका व्यक्तीचा पक्ष होऊ शकत नाही – मोदी

काँग्रेस हे जातीवाद, भ्रष्टाचार यांची एक संस्कृती आहे. मी काँग्रेसमुक्त भारताचा नारा देतो, तेव्हा या संस्कृतीचा नायनाट करण्याचा नारा देतो, काँग्रेसलाही ही संस्कृती सोडावी लागेल – मोदी

2013-14 च्या हेडलाईन्स पाहा आणि आजच्या हेडलाईन्स पाहा, देशातील जनतेवर आणि तरुणांवर माझा विश्वास आहे – मोदी

भाजपच्या जागा कमी होतील असा अंदाज नाही लावला तर विरोधकांच्या महाआघाडीत पक्ष येतील कसे? स्वतःला वाचवण्यासाठी हे बोलावं लागतं, 2014 मध्येही हेच लॉजिक लावलं जात होतं – मोदी

2013 मध्ये जे लोक म्हणायचे की मोदी जिंकू शकत नाही, त्याच लोकांनी मोदी लाट असल्याचं मान्य केलं. लाट ही फक्त जनतेच्या विश्वासावर असते, आज भारतात विश्वास दिसून येतोय, तरुणांच्या आशा वाढल्यात – मोदी

तेलंगणा आणि मिझोराममध्ये भाजप सत्तेवर येण्याची आशा नव्हती, पण ज्या तीन राज्यात पराभव झाला, तिथे भाजपची 15 वर्षांपासून सत्ता होती, अँटी इनकम्बन्सीचा फटका बसला – मोदी

ज्या देशाला पर्यावरणाच्या नुकसानासाठी जबाबदार मानलं जात होतं, त्याच भारताला 2018 मध्ये संयुक्त राष्ट्राकडून चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार मिळाला – मोदी

तेलंगणा आणि मिझोराममध्ये भाजप सत्तेवर येण्याची आशा नव्हती, पण ज्या तीन राज्यात पराभव झाला, तिथे भाजपची 15 वर्षांपासून सत्ता होती, अँटी इनकम्बन्सीचा फटका बसला – मोदी

ज्या देशाला पर्यावरणाच्या नुकसानासाठी जबाबदार मानलं जात होतं, त्याच भारताला 2018 मध्ये संयुक्त राष्ट्राकडून चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार मिळाला – मोदी

नोटाबंदी हा झटका नव्हता. काळा पैसा असेल तर दंड भरुन तो जमा करा असं आम्ही एक वर्षापासून सांगत होतो, पण त्यांना वाटलं इतरांप्रमाणेच मोदीही वागत आहे आणि काही तुरळक लोकांनी पैसा जमा केला – मोदी

सर्जिकल स्ट्राईकसारख्या एका लढाईने पाकिस्तान सुधारेल ही अपेक्षा करणं मोठी चूक, पाकिस्तानला सुधारण्यासाठी आणखी वेळ लागेल – मोदी

ज्यांनी फक्त प्रथम कुटुंबाचा विचार केला, चार पिढ्या देश चालवला, सध्या जामिनावर बाहेर आहेत आणि तेही आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी. ही मोठी गोष्ट आहे. त्यांच्यासोबत जे आहेत, ते सत्य दाबण्याचा प्रयत्न करत आहेत – मोदी

वैयक्तिक कारणांसाठी राजीनामा देणार असल्याचं उर्जित पटेल यांनी 6-7 महिन्यांपूर्वीच सांगितलं होतं, पहिल्यांदाच खुलासा करतोय. गव्हर्नर म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. राजकारणाचा प्रश्नच नाही – मोदी

2019 ची निवडणूक ही जनता विरुद्ध महाआघाडी, मोदी म्हणजे जनतेच्या प्रेमाचा जाहीरनामा – मोदी

सर्जिकल स्ट्राईक ही एक मोठी रिस्क होती, पण मला सर्वात जास्त चिंता होती ती सैनिकांची – मोदी

राम मंदिर घटनेनुसारच होईल, न्याय प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय अध्यादेश नाही – मोदी

पाहा लाईव्ह :

Non Stop LIVE Update
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.