अल्पवयीन मुलीला पळवून लैंगिक अत्याचार, नराधम काकाला अटक

अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन लैंगिक अत्याचार करणाऱ्या काकाला चंदनझिरा पोलिसांनी अटक केली आहे. औरंगाबाद शहरातील मुख्य बसस्टँड येथून आरोपीला सापळा रचून अटक करण्यात आलं

अल्पवयीन मुलीला पळवून लैंगिक अत्याचार, नराधम काकाला अटक
Follow us
| Updated on: Feb 08, 2020 | 4:06 PM

जालना : अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन लैंगिक अत्याचार करणाऱ्या काकाला चंदनझिरा पोलिसांनी अटक केली आहे. औरंगाबाद शहरातील मुख्य बसस्टँड येथून आरोपीला सापळा रचून अटक करण्यात आलं (Minor Kidnapping). मावशी आजारी असल्याचं खोटं सांगून आरोपीने अल्पवयीनला पळवून नेलं होतं. तसेच, तिच्यावर लैंगिक अत्याचारही केले, अशी तक्रार पीडितेने केली आहे. यावरुन पोलिसांत काकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदनझिरा पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली (Minor Kidnapping And Molestation).

जालना शहरातील ढवळेश्वर भागातील एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची तक्रार तिच्या आईने पोलिसात दिली होती. त्यावरुन पोलिसांनी मुलीचा शोध सुरु केला. मुलीला फूस लावून पळवून नेणारा आरोपी तिच्याच मावशीचा नवरा असल्याचे पोलीस तपासात समोर आलं होतं. मात्र, आरोपीने त्याचा मोबाईल बंद करुन ठेवला असल्याने त्याला शोधणे कठीण झाले होतं.

पोलिसांनी आरोपीच्या सर्व नातेवाईकांच्या घरी जाऊन त्याचा शोध घेतला, मात्र त्याच्याबाबत कुठलीही माहिती मिळाली नाही. मात्र, अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं. आरोपीने त्याच्या पत्नीला दुसऱ्याच्या मोबाईलवरुन संपर्क करुन परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे येण्यास सांगितले. आरोपीच्या फोननंतर पोलिसांनी पूर्णा रेल्वे स्टेशनवर सापळा रचला. मात्र, हा नराधम काका तिथे आलाच नाही.

त्याने परत पत्नीला फोन करुन औरंगाबादला बोलावले. आता मात्र पोलीस संपूर्ण तयारीने गेले आणि औरंगाबाद शहरातील मुख्य बसस्टँड येथे आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी खाक्या दाखवताच काकाने अल्पवयीन मुलीला कुठे ठेवलं आहे हे सांगितलं.

अल्पवयीनला मावशी आजारी असल्याचे खोटे सांगून पळवून नेल्याचं तपासात उघड झालं. पळवून नेऊन काकाने अल्पवयीन मुलीला नातेवाईकाच्या घरी कोंडून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचंही समोर आलं आहे. या प्रकरणी पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.