पालघरमध्ये चोर-दरोडेखोर असल्याच्या अफवेतून तिघांची हत्या, 101 आरोपींना पोलीस कोठडी

चोर-दरोडेखोर समजून तिघांची हत्या केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने 101 जणांना पोलीस कोठडी दिली आहे (Police custody in Palghar Mob lynching case).

पालघरमध्ये चोर-दरोडेखोर असल्याच्या अफवेतून तिघांची हत्या, 101 आरोपींना पोलीस कोठडी
Follow us
| Updated on: Apr 19, 2020 | 11:02 AM

पालघर : चोर-दरोडेखोर समजून तिघांची हत्या केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने 101 जणांना पोलीस कोठडी दिली आहे (Police custody in Palghar Mob lynching case). पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात ही घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना कोठडी दिली. हत्या झालेल्यांपैकी दोन साधू तर एक वाहनचालक होता. विशेष म्हणजे आरोपींनी पोलिसांवरही हल्ला केला होता. यात पोलिसांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं (Mob lynching in Palghar).

डहाणू न्यायालयाने आरोपींना 30 एप्रिलपर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे. यातील 9 आरोपी 18 वर्षाखालील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पोलीस इतर काही फरार आरोपींचा अद्याप शोध घेत आहेत. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद आहेत. मात्र, याच दरम्यान पालघर जिल्ह्यात रात्रीच्यावेळी तीन ते चार सराईत चोर फिरत असल्याची अफवा पसरली. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण तयार होऊन गावकऱ्यांनी तिघांना बेदम मारहाण केली.

गावात सुरुवातीला अफवा पसरल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्रितपणे पहारा देण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी (16 एप्रिल) रात्री उशिरा एक इको गाडी दाभाडी-खानवेल मार्गावरुन जात होती. या गाडीत वाहनचालकासह तिघे जण होते. यापैकी दोन जण साधू होते. ते नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला जात होते. मात्र, दाभाडी-खानवेल मार्गावर 100 जणांच्या जमावाने त्यांची गाडी अडवली. त्यांची पूर्णपणे विचारपूस न करताच चोर समजून त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यावर दगडफेक आणि लाठ्यांचा हल्ला केला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला.

पालघरच्या कासा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रचंड प्रयत्न केला. मात्र, जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. अखेर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करत सर्वांना ताब्यात घेतलं. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. कोणत्याही अफवांना बळी पडू नका, असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

साधूंचे मृतदेह त्र्यंबकेश्वरला रवाना

गडचिंचले गावात चोर समजून हत्या केलेल्या तिघांचा मृतदेहाचे तलासरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन व पंचनामा करण्यात आला. त्यानंतर शनिवारी (18 एप्रिल) सांयकाळी त्रंबकेश्वर येथून आलेल्या साधू महाराज यांच्या स्वाधीन करण्यात आला. सोशल मीडियावर उठलेल्या चोर दरोडेखोरांच्या अफवेने तिघांची निर्घृणपणे हत्या झाली.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनमध्ये माहेरी जाण्याचा हट्ट, पतीशी वादानंतर विवाहितेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

पुण्यात बिस्कीटाच्या टेम्पोतून गुटख्याची वाहतूक, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गोरखधंदा

Corona Effect : लुडो खेळताना तोंडावर खोकला, मित्राने ठोकला, पाच राऊंड फायर

Police custody in Palghar Mob lynching case

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.