पुणे तिथे काय उणे! कुत्र्याचा आजार बरा व्हावा म्हणून जागरण गोंधळ

पुणे : ‘पुणे तिथे काय उणे’ ही उक्ती कित्येकदा पुणेकरांना नेमकेपणाने लागू होते. पुन्हा एकदा या उक्तीचा प्रत्यय पुण्यात आला आहे. लाडक्या कुत्र्याची आजारपणातून लवकर सुटका व्हावी, यासाठी पुण्यातील एका कुटुंबाने चक्क जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केला होता. एरवी एखाद्या कुटुंबामध्ये लग्नकार्य असेल तर जागरण गोंधळ घालण्याची परंपरा खूप वर्षांपासून आहे. पण एखाद्या कुत्र्यासाठी घातलेला […]

पुणे तिथे काय उणे! कुत्र्याचा आजार बरा व्हावा म्हणून जागरण गोंधळ
Follow us
| Updated on: May 22, 2019 | 7:52 AM

पुणे : ‘पुणे तिथे काय उणे’ ही उक्ती कित्येकदा पुणेकरांना नेमकेपणाने लागू होते. पुन्हा एकदा या उक्तीचा प्रत्यय पुण्यात आला आहे. लाडक्या कुत्र्याची आजारपणातून लवकर सुटका व्हावी, यासाठी पुण्यातील एका कुटुंबाने चक्क जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केला होता. एरवी एखाद्या कुटुंबामध्ये लग्नकार्य असेल तर जागरण गोंधळ घालण्याची परंपरा खूप वर्षांपासून आहे. पण एखाद्या कुत्र्यासाठी घातलेला हा जागरण गोंधळ चर्चेचा विषय ठरत आहे.

पुण्यातील धनकवडी परिसरात राहणारे नाना जाधव यांच्याकडे दोन वर्षे वयाचा रॉटविलर जातीचा कुत्रा आहे. त्याचे नाव ब्रुनो. या कुत्र्याला गॅस्ट्रो झाल्याने त्याला काही खाता-पिता येत नव्हते.

जाधव यांच्याकडे यापूर्वीही रॉटविलर जातीचा कुत्रा होता. पण तो दहा महिन्याचा असताना त्याला गॅस्ट्रो झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. परंतु मुलीला ब्रुनोचा लळा लागल्यामुळे त्यांनी तसाच कुत्रा आणला. परंतु त्यालाही गॅस्ट्रो झाला आणि आठ दिवस काहीही न खता-पिता तो सलाईनवर होता.

जाधव यांच्या एका मित्राने त्यांना खंडोबाला नवस करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर जाधव यांनी जेजुरीच्या खंडोबाला ब्रुनो जर या आजारातून जगला तर जागरण गोंधळ घालू असा नवस केला. त्यानंतर ब्रुनो आजारातून पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्यांनी बकरे कापून लोकांना जेवू घातले आणि जागरण गोंधळ घालून नवस पूर्ण केला.

विशेष म्हणजे, जागरण गोंधळासाठी सोलापूर येथील प्रसिद्ध गोंधळी अंकू-पंकू यांना बोलावून अगदी थाटात हा नवस पूर्ण केला. या आगळ्या वेगळ्या जागरण गोंधळाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.