‘खड्डे दाखवा, पैसे कमवा’अंतर्गत 997 तक्रारी, वॉर्ड अधिकाऱ्यांचे खिसे रिकामे

महापालिकेच्या अ‍ॅपवर खड्ड्यांच्या 997 तक्रारी आल्या, मात्र दहा टक्के खड्डे न बुजल्याने वॉर्ड अधिकाऱ्यांचे खिसे रिकामे झाले आहेत

'खड्डे दाखवा, पैसे कमवा'अंतर्गत 997 तक्रारी, वॉर्ड अधिकाऱ्यांचे खिसे रिकामे
Follow us
| Updated on: Nov 05, 2019 | 10:34 AM

मुंबई : पावसाळा गेला असला तरी मुंबईमधील रस्त्यांवर आजही खड्ड्यांचं साम्राज्य आहे. खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने मागील आठवड्यात ‘खड्डे दाखवा आणि 500 रुपये मिळवा’ या योजनेची सुरुवात केली. याला मुंबईकरांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेच्या अ‍ॅपवर मागील चार दिवसांत खड्ड्यांच्या 997 तक्रारी नोंद झाल्या. मात्र दहा टक्के खड्डे न बुजल्याने वॉर्ड अधिकाऱ्यांचे खिसे रिकामे (Pothole Challenge by BMC) झाले आहेत.

पहिल्या तीन दिवसांत दाखल झालेल्या 879 तक्रारींपैकी 794 खड्डे म्हणजेच 90 टक्के खड्डे 24 तासांत बुजवण्यात आले आहेत. मात्र 85 खड्डे 24 तासांत बुजवता न आल्याने संबधित वॉर्ड अधिकाऱ्यांना खडड्याची तक्रार करणाऱ्या नागरिकांना 42 हजार 500 रुपये बक्षिस आपल्या खिशातून द्यावे लागणार आहेत.

पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने कंत्राटदारांची नेमणूक करुन तब्बल 80 कोटी रुपयांचे कंत्राट दिले. मात्र तरीही मुंबईत अनेक ठिकाणी खड्ड्यांनी रस्त्यांची चाळण झाली आहे. मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मलमपट्टी सुरु असल्याने अल्पावधीतच पुन्हा खड्डे पडत असल्याच्या तक्रारी आहेत.

खड्डे दाखवा, पैसे कमवा*, मुंबई महापालिकेच्या ऑफरमागे तीन अटी

नोव्हेंबर उजाडला तरी खड्डे बुजत नसल्याने मुंबईकरांमध्ये संतापाच्या प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे प्रशासनाने अखेर यावर पर्याय शोधत मोठ्या आकाराच्या खड्ड्यांची तक्रार करा आणि तक्रारीनंतर 24 तासांमध्ये ते न बुजल्यास 500 रुपयांचे बक्षीस देण्याची योजना लागू केली. त्यावरुन स्थायी समितीत तीव्र पडसाद उमटले. बक्षिसाची ही रक्कम संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या खिशातून दिली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

पाचशे रुपये कमवण्यासाठी महापालिकेच्या अटी कोणत्या?

-मुंबईकरांनी दाखवलेला खड्डा कमीत कमी 1 फूट लांब आणि 3 इंच खोल पाहिजे

-तक्रारीनंतर 24 तासांत खड्डा भरला गेला, तर पैसे मिळणार नाहीत.

-खड्डे दाखवा, पैसे मिळवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘My BMC pothole fixlt’ या अॅपवर जाऊन खड्ड्यांची तक्रार नोंदवावी लागेल

खड्ड्यांच्या तक्रारी करा आणि 24 तासांत न बुजल्यास 500 रुपये मिळवा ही योजना 7 नोव्हेंबरपर्यंत आहे. मात्र सुरुवातीलाच याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे योजनेमुळे सात दिवसांत रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात खड्डे बुजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

चिखलात रुतलेल्या एसटीचा फोटो पाहून गडकरींनी कंत्राटदारांना झापलं

मुंबईतील रस्त्यांवरील मोठ्या खड्ड्यांची तक्रार केल्यानंतर 24 तासांमध्ये खड्डा न बुजल्यास 500 रुपये बक्षीस योजना महापालिकेने जाहीर केली आहे. गेल्या शनिवारपासून या योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली असून या योजनेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. महापालिकेच्या अ‍ॅपवर खड्ड्यांच्या तकारींचा ओघ सुरु आहे. योजना सुरु झाल्यानंतर चार दिवसांत या अ‍ॅपवर 997 तक्रारी नोंदवण्यात आल्या. मात्र 24 तासाची डेडलाईन हुकल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना खड्डे न बुजलेल्या 85 खड्ड्यांचे बक्षिस (Pothole Challenge by BMC) तक्रारदारांना द्यावे लागणार आहे

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....