शिवसेनेने ‘चाणक्य’ निवडला, प्रशांत किशोरांकडे रणनीती सोपवली!

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर खासदार संजय राऊत यांनी मोठी बाब उघड केली. लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक रणनीतीकार म्हणून देशात ओळख असलेले प्रशांत किशोर हे शिवसेनेचा प्लॅन तयार करणार आहेत. यापूर्वी प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचार आणि निवडणूक रणनीती […]

शिवसेनेने 'चाणक्य' निवडला, प्रशांत किशोरांकडे रणनीती सोपवली!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर खासदार संजय राऊत यांनी मोठी बाब उघड केली. लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक रणनीतीकार म्हणून देशात ओळख असलेले प्रशांत किशोर हे शिवसेनेचा प्लॅन तयार करणार आहेत. यापूर्वी प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचार आणि निवडणूक रणनीती ठरवली होती, तसंच बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याही विजयात प्रशांत किशोर यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्या डोक्याने लढण्याची तयारी शिवसेनेने केली आहे.

प्रशांत किशोर यांनी स्वत: मातोश्रीवर येऊन प्रेझेंटेशन दिल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.

“निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे आगामी निवडणुकीत शिवसेनेची रणनीती ठरवतील. ते सध्या एनडीएच्या घटक पक्ष असलेल्या जनता दल युनायटेडचे नेते आहेत. प्रशांत किशोर हे एनडीएतील नेते असले तरी ते आता शिवसेनेसाठी काम करतील”, असं संजय राऊत म्हणाले.

प्रशांत किशोर कोण आहेत? 42 वर्षीय प्रशांत किशोर हे उत्तर प्रदेशच्या बलियाचे रहिवासी आहेत.

प्रशांत किशोर हे संयुक्त राष्ट्राच्या ‘हेल्थ मिशन’चे दक्षिण आफ्रिकेतील प्रमुख म्हणून काम.

नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी आफ्रिकेतील नोकरी सोडून आले होते.

त्यांनी भारतातील राजकारण आणि निवडणुकांत काम करण्यासाठी सिटीझन्स फॉर अकाऊंटेबल गव्हर्नन्स अर्थात CAG कंपनीची स्थापना केली.

या कंपनीच्या माध्यमातून प्रशांत यांनी दिग्गजांच्या प्रचाराची कंत्राटं घेतली आणि त्यांना निवडून आणलं.

2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत मोदींच्या सोशल मीडियाची जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे होती.

‘अब की बार मोदी सरकार’ ही प्रशांत किशोर यांच्या टीमचीच घोषणा होती

2015 मध्ये प्रशांत किशोर यांनी मोदींची साथ सोडली.

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपऐवजी त्यांनी नितीश कुमार यांच्या जेडीयूच्या प्रचाराची धुरा सांभाळली

बिहारमध्ये जेडीयूला भरघोस यश मिळून, नितीश कुमार सत्तेत आले.

प्रशांत किशोर हे सध्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूमध्ये दुसऱ्या पदावर आहेत

निवडणूक न लढवूनही त्यांना बिहारमध्ये राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे.

बिहार निवडणुकीत जेडीयूची रणनीती प्रशांत किशोर यांनीच आखली होती. त्यामुळे जेडीयूला मोठं यश मिळालं.

त्यापूर्वी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी मिळवलेल्या बलाढ्य विजयाची रणनीती प्रशांत किशोर यांनीच ठरवली होती.

‘चाय पे चर्चा’, 3D सभा, ऑनलाईन दरबार, वॉर रुम, सोशल मीडिया, व्हिक्टरी रुम, घर घर दस्तक, रिंगटोन आणि रेकॉर्डेड मेसेज, अशा नवनव्या प्रचार कल्पना प्रशांत किशोर यांनी राबवल्या होत्या.

गुजरातमध्ये 3D प्रचार लोकसभेपूर्वी मोदींच्या 3D सभेचं आयोजन गुजरात निवडणुकीत करण्यात आलं होतं. त्यावेळी प्रशांत यांनीच ही योजना आखली होती. त्याचवेळी मोदींची प्रतिमा बदलून हायटेक आणि टेक्नोसेव्ही मुख्यमंत्री अशी झाली होती.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.