कोरोनामुळे मलाही सोडलंय, नागपूर जेलमधून पळून गेलेला कैदी दिल्लीत बहिणीच्या घरी सापडला

आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र संधीचा गैरफायदा घेऊन तो पळून गेला होता. (prisoner who escaped from Nagpur Jail was found in Delhi)

कोरोनामुळे मलाही सोडलंय, नागपूर जेलमधून पळून गेलेला कैदी दिल्लीत बहिणीच्या घरी सापडला

नागपूर : नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील पळून गेलेल्या कच्च्या कैद्याला दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे. खटला सुरु असलेला आणि न्यायलयीन कोठडीत असलेला सिजो चंद्रन हा कैदी पळून गेला होता. सिजो चंद्रनला 16 मे रोजी शासकीय मेडिकल रुग्णालयाच्या टीबी वॉर्डात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. मात्र संधीचा गैरफायदा घेऊन तो पळून गेला होता. (prisoner who escaped from Nagpur Jail was found in Delhi)

यापूर्वी देखील त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन धूम ठोकली होती. फसवणुकीसह इतर प्रकरणात सिजो चंद्रन हा नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात विचाराधीन अर्थात कच्चा कैदी आहे. आजारी असल्याने काही दिवसांपासून त्याला शासकीय मेडिकल रुग्णालयाच्या क्षयरोग वार्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

16 मे रोजी सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांची नजर चुकवून तो पळून गेला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी फरार झालेला आरोपी चंद्रनचा शोध घेण्यास सुरुवात केली. आरोपी दिल्ली येथील बहिणीकडे गेला असावा अशी माहिती पोलिसांना समजली, तेव्हा अजनी पोलिसांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क करुन आरोपी सिजो चंद्रन संदर्भात सूचना दिली. तेव्हा दिल्ली पोलिसांनी त्याला त्याच्या बहिणीच्या घरातून अटक केली.

कोरोनाचा धोका वाढला असल्याने महाराष्ट्र शासनाने हजारो कैद्यांची मुक्तता केली आहे. मला देखील सोडून दिल्याची माहिती आरोपीने आपल्या बहिणीला दिली.

यापूर्वी 19 जुलै 2019 रोजी आरोपी चंद्रन शासकीय मेडिकल रुग्णालयाच्या सुपर हॉस्पटिलमधून पळून गेला होता. त्यानंतर नागपूर पोलिसांनी तेलंगणा येथून त्याला अटक केली होती हे विशेष. एकच कैदी वर्षभरात दोनवेळा पळून जाण्यात यशस्वी झाला असला, तरी दोन्ही वेळा तो फार काळ लपून राहू शकला नाही.

(prisoner who escaped from Nagpur Jail was found in Delhi)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *