'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर तुरुंगातील कैद्यांच्याद्वारे मास्कची निर्मिती, गृहमंत्र्यांच्या कल्पनेतून राज्यभरात सुरुवात

'कोरोना' विषाणूच्या फैलावाच्या अनुषंगाने राज्यात मास्कची मागणी मोठ्या प्रमाणात (Prisoners making mask in jail) वाढली आहे.

'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर तुरुंगातील कैद्यांच्याद्वारे मास्कची निर्मिती, गृहमंत्र्यांच्या कल्पनेतून राज्यभरात सुरुवात

मुंबई : ‘कोरोना’ विषाणूच्या फैलावाच्या अनुषंगाने राज्यात मास्कची मागणी मोठ्या प्रमाणात (Prisoners making mask in jail) वाढली आहे. यातून बाजारात मास्कचा तुटवडाही निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कल्पनेतून राज्यातील सर्व मध्यवर्ती कारागृहांमध्ये कैद्यांद्वारे मास्क निर्मिती (Prisoners making mask in jail) करण्यात येत आहे.

कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे मास्कच्या मागणीत वाढ झाली आहे. यासाठी कारागृहातील कैद्यांद्वारे मास्क निर्मिती करुन पुरवठ्याचे प्रमाणा विढविता येणे शक्य असल्यामुळे अनील देशमुख यांनी मास्क निर्मितीची कल्पना मांडली.

अनील देशमुख यांच्या या कल्पनेला तुरुंग प्रशासनानेही उत्तम प्रतिसाद देत तात्काळ मास्क निर्मितीला प्रारंभ केला आहे. हे मास्क बनवून ते स्वतःही तसेच तुरुंग प्रशासनही वापरत आहे. तसेच बाजारातील तुटवडा पाहता विक्रीसाठी पुरवठादारांना देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे कैद्यांचा मोबदला त्यांच्या नावावर जमा केला जातो.

तुरुंगात भरती होणाऱ्या नव्या कैद्यांची स्क्रीनिंग

कोरोना विषाणूच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगात नव्याने भरती होणाऱ्या प्रत्येक कैद्यांचे ‘स्क्रीनिंग’ करण्यात यावे. नव्याने भरती होणाऱ्या कैद्यांना आवश्यकता असल्यास इतर कैद्यांपासून वेगळे ठेवण्यात यावे. आधीपासून तुरुंगात असलेल्या सर्व बंद्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.

दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 42 वर पोहोचली आहे. पुण्यात आणखी एका महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे. फ्रान्स आणि नेदरलँड्सला फिरुन आलेल्या महिलेचा ‘कोरोना’ रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18 वर पोहोचली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *