काँग्रेस रिटर्न प्रियांका चतुर्वेदींना शिवसेनेचं तिकीट, खैरे, रावतेंना डावललं

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी उमेदवार यादी जाहीर केली असताना इकडे शिवसेनेनेही (Priyanka Chaturvedi rajya sabha Shiv sena) आपला एकमेव उमेदवार जाहीर केला आहे.

काँग्रेस रिटर्न प्रियांका चतुर्वेदींना शिवसेनेचं तिकीट, खैरे, रावतेंना डावललं
Priyanka Chaturvedi
Follow us
| Updated on: Mar 12, 2020 | 1:14 PM

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी उमेदवार यादी जाहीर केली असताना इकडे शिवसेनेनेही (Priyanka Chaturvedi rajya sabha Shiv sena) आपला एकमेव उमेदवार जाहीर केला आहे. शिवसेनेने राज्यसभेसाठी काँग्रेसमधून आलेल्या प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi rajya sabha Shiv sena)  यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी मंत्री दिवाकर रावते यांची नावं चर्चेत होती. मात्र निष्ठावंतांना डावलून शिवसेनेने आपली उमेदवारी प्रियांका चतुर्वेदी यांना जाहीर केली.

राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी उत्सुक होत्या. त्यादृष्टीने चतुर्वेदींनी प्रयत्न सुरु केले होते. विशेष म्हणजे प्रियंका चतुर्वेदी या पर्यावरण-पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. चतुर्वेदींनी थेट ‘फील्डिंग’ लावल्याने राज्यसभेच्या एका जागेच्या शर्यतीत त्या पुढे होत्या. अखेर त्यांनाच तिकीट जाहीर झालं.

अन्य पक्षातून आलेल्या नेत्यांपेक्षा जुन्या जाणत्या नेत्यांनाच संधी मिळाली पाहिजे असा पक्षात मतप्रवाह होता. शिवाय यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, अनंत गिते यांची नावेही चर्चेत होते. याशिवाय विधानपरिषदेचे आमदार दिवाकर रावतेही उत्सुक होते.

महाराष्ट्रातील भाजपचे उमेदवार

भाजपने पहिल्या यादीत महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर आता भागवत कराड यांनाही उमेदवारी देऊन 7 पैकी 3 जागांवर दावा केला आहे.

उदयनराजे भोसले  आणि रामदास आठवले यांनी आपला राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला. महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या 7 खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. त्यामुळे 26 मार्चला राज्यसभेच्या या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे भाजपकडून कुणाला उमेदवारी मिळणार याविषयी अनेक नावांची चर्चा होती. यात भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, माजी खासदार उदयनराजे भोसले या तिघांची चर्चा होती. मात्र, उमेदवारांच्या घोषणेनंतर एकनाथ खडसे यांना स्थान मिळाले नसल्याचं दिसत आहे.

राष्ट्रवादी-काँग्रेसचा तिढा सुटला

राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महाविकास आघाडीतील चौथ्या जागेसाठी काँग्रेस आग्रही असल्यामुळे राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवार फौजिया खान ‘वेट अँड वॉच’वर होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांच्या समन्वय समितीच्या बैठकीत यावर तोडगा निघाल्याने फौजिया खानही आज उमेदवारी अर्ज भरत आहेत. (Congress Rajyasabha Candidate Rajiv Satav)

राज्यसभा नियुक्तीसाठी निकष काय?

राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची 37 मतं आवश्यक आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे चार तर भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येतील. शिल्लक राहिलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा आणि भाजपचा प्रयत्न राहणार आहे.

26 मार्चला निवडणूक

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी 26 मार्चला निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख उद्या (शुक्रवार 13 मार्च) आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार, तर भाजपचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी दोन तर काँग्रेस-शिवसेना प्रत्येकी एक जागा लढणार आहे.

महाराष्ट्रातील 7 जागांसाठी उमदेवार

  1. उदयनराजे भोसले – भाजप
  2. भागवत कराड – भाजप
  3. रामदास आठवले – भाजप पुरस्कृत
  4. शरद पवार – राष्ट्रवादी
  5. फौजिया खान – राष्ट्रवादी
  6. राजीव सातव – काँग्रेस (अधिकृत घोषणा बाकी)
  7. प्रियांका चतुर्वेदी – शिवसेना

कोण आहेत प्रियांका चतुर्वेदी?

  • प्रियांका चतुर्वेदी यांनी एक वर्षापूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला.
  • 19 एप्रिल 2019 रोजी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधान बांधलं.
  • त्याआधी त्यांनी काँग्रेसच्या प्रवक्त्या आणि पक्षाच्या मीडिया सेलच्या संयोजक म्हणून काम पाहिलं.
  •  2010 मध्ये त्यांनी काँग्रेसपक्षात प्रवेश केला होता.
  • काँग्रेसने 2012 मध्ये त्यांना मुंबई उत्तर-पश्चिमच्या भारतीय युवा काँग्रेसच्या सरचिटणीस बनवलं.
  • त्या नेहमीच न्यूज चॅनल्सवर होणाऱ्या राजकीय चर्चांमध्ये काँग्रेसचा पक्ष मोठ्या मजबुतीने मांडताना दिसायच्या.
  • मात्र, पक्षातील काही नेत्यांनी त्यांच्यासोबत केलेल्या गैरव्यवहारामुळे त्या पक्षावर नाराज होत्या.
  • 17 एप्रिल 2019 रोजी त्यांनी ट्विटरवर एक ट्विट करत उत्तर प्रदेश काँग्रेसबाबत नाराजी व्यक्त केली होती. उत्तर प्रदेश काँग्रेसने प्रियांका चतुर्वेदी यांच्यासोबत गैरव्यवहार केलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात सामील केल्याने त्या नाराज होत्या.
  • त्यानंतर त्यांनी राहुल गांधींकडे त्यांचा राजीनामा सुपूर्द केला.
  • प्रियंका चतुर्वेदी या पर्यावरण-पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात.
Non Stop LIVE Update
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.