Pune Corona | पुणे विभागात कोरोनाबाधितांची संख्या 6,823 वर, कुठल्या जिल्ह्यात किती रुग्ण?

पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजार 823 वर पोहोचली आहे. तर विभागात कोरोनाबाधित 324 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Pune Corona | पुणे विभागात कोरोनाबाधितांची संख्या 6,823 वर, कुठल्या जिल्ह्यात किती रुग्ण?

पुणे : पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजार 823 वर (Pune Corona Latest Update) पोहोचली आहे. तर विभागात कोरोनाबाधित 324 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या विभागात 3 हजार 178 ॲक्टिव्ह रुग्ण असून 210 रुग्ण गंभीर आहेत. तर 3 हजार 321 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी (Pune Corona Latest Update) गेले आहेत.

पुणे शहरात कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजार 782 वर

पुणे शहरात आज दिवसभरात तब्बल 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबळींची संख्या आता 255 वर पोहोचली आहे. तर आज शहरात 179 नवीन बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजार 782 वर पोहोचला आहे. आज दिवसभरात 77 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 2,550 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या शहरात 1,977 अॅक्टिव्ह रुग्ण असून 176 क्रिटिकल आहेत. तर 47 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

पुणे विभागात कुठल्या जिल्ह्यात किती रुग्ण?

पुणे जिल्हा – पुणे जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आणि मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यात 5 हजार 616 बाधित रुग्ण असून त्यापैकी 2 हजार 905 रुग्ण बरे झाले आहेत. तर 2 हजार 444 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 267 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 204 रुग्ण गंभीर असून वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

सातारा जिल्हा – सातारा जिल्ह्यात 278 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी 114 बाधित रुग्ण बरे झाले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 157 आहे. आतापर्यंत कोरोनाबाधित 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा – सोलापूर जिल्ह्यात 570 कोरोनाबाधित रुग्ण असून 249 बाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर 275 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाबाधित एकूण 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे (Pune Corona Latest Update).

सांगली जिल्हा – सांगली जिल्ह्यात 73 कोरोनाबाधित रुग्ण असून 40 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या सागंलीत 31 अॅक्टिव्ह रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला.

कोल्हापूर जिल्हा – कोल्हापूर जिल्ह्यात 286 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. आतापर्यंत 13 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यात 271 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनाबाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Pune Corona Latest UpdatePune Corona Latest Update

संबंधित बातम्या :

कोरोना लक्षणांकडे दुर्लक्ष, पुण्यात 21 वर्षीय तरुणाने रुग्णालयात 30 मिनिटात प्राण सोडले

आलिशान कारची डिकी उघडली; टेम्पोतून शहाळी हटवली, पुणे पोलिसांना सापडला 120 किलो गांजा

Pune Corona | पुण्यात साडे सहा तासात 131 नवे रुग्ण

पुण्यात घाऊक औषध विक्रीसाठी दिवस ठरले, कोणत्या विभागात कधी विक्री?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *