रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने डिस्चार्ज, पुण्यात 'कोरोना'ग्रस्त महिलेचा मृत्यू

60 वर्षीय महिला तीन दिवसांपूर्वी नायडू रुग्णालयात दाखल झाली होती. यावेळी ती 'कोरोना' निगेटिव्ह असल्याने तिला डिस्चार्ज दिला होता. (Pune Corona Negative Lady Death after Discharge)

रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने डिस्चार्ज, पुण्यात 'कोरोना'ग्रस्त महिलेचा मृत्यू

पुणे : पुण्यात आणखी एका ‘कोरोना’ग्रस्त महिलेला प्राण गमवावे लागले आहेत. धक्कादायक म्हणजे कोरोनाची लागण झालेल्या महिलेचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तिला डिस्चार्ज मिळाला होता, परंतु पुन्हा प्रकृती ढासळल्याने रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. (Pune Corona Negative Lady Death after Discharge)

पुण्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या ‘कोरोना’ग्रस्तांची संख्या तीनवर पोहोचली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यापूर्वी काल रात्री ‘कोरोना’ग्रस्त महिलेचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 33 ‘कोरोना’बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नेमकं काय झालं?

संबंधित 60 वर्षीय महिला तीन दिवसांपूर्वी नायडू रुग्णालयात दाखल झाली होती. यावेळी ती ‘कोरोना’ निगेटिव्ह असल्याने तिला डिस्चार्ज दिला होता. मात्र घरी गेल्यानंतर इंक्युबेशन पिरेडमध्ये असताना अचानक तिची तब्येत ढासळली. काल तिला ससून रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यासाठी नेलं जात होतं, मात्र तोपर्यंत महिलेचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर सॅम्पल चेक केले असता, ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली.

हेही वाचा : पुण्यात तीन वर्षांची चिमुकली ‘कोरोना’बाधित, निजामुद्दीनहून परतलेल्या आजोबांमुळे संसर्ग

विशेष म्हणजे या महिलेने परदेशात प्रवास केलेला नाही. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे तिला कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता आहे.

धक्कादायक प्रकार म्हणजे, पुण्यात याआधी (2 एप्रिल) एका 50 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्या महिलेनेही कोणताही परदेशी प्रवास केला नव्हता. तर 30 मार्चला पुण्यात 52 वर्षीय ‘कोरोना’ग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

पाहा व्हिडिओ :

पुणेकरांची धाकधूक वाढली

पुणे जिल्ह्यात काल एकाच दिवशी एकूण वीस नवे कोरोना रुग्ण आढळले. पुण्यात 9, तर पिंपरीत सहा रुग्ण पॉझिटिव्ह सापडले. पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 83 वर गेली आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात 23 ने रुग्णांची संख्या वाढली, तर पुणे विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 104 वर गेली आहे.

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

1. मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च
2. मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च
*मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)*
3. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च
4. मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च
5. नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
6. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
7. बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च
8. मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च
9. पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
10. मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
11. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 31 मार्च
12. पालघर  – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
13. मुंबई – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
14. मुंबई – 84 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
15. मुंबई – 73 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
16. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
17. मुंबई – 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
18. जळगाव – एका रुग्णाचा मृत्यू – 2 एप्रिल
19. मुंबई – 61 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
20. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
21. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
22. मुंबई – 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल
23. पुणे – 50 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
24. वसई – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल
25. बदलापूर – एका रुग्णाचा मृत्यू – 3 एप्रिल
26. मुंबई – 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 3 एप्रिल
27. अमरावती – एका रुग्णाचा मृत्यू – 4 एप्रिल
28. मुंबई – 70 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
29. मुंबई – 53 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
30. मुंबई – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
31. मुंबई – 47 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 4 एप्रिल
32. मुंब्रा – 57 वर्षीय पुरुषाचा मृत्यू -= 4 एप्रिल
33. पुणे – 60 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल
(Pune Corona Negative Lady Death after Discharge)

ताजी आकडेवारी इथे पहा :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई410993741319
पुणे (शहर+ग्रामीण)7451938320
पिंपरी चिंचवड मनपा468349
ठाणे (शहर+ग्रामीण)
46543690
नवी मुंबई मनपा27298067
कल्याण डोंबिवली मनपा13339127
उल्हासनगर मनपा3566
भिवंडी निजामपूर मनपा154116
मिरा भाईंदर मनपा71515719
पालघर 15213
वसई विरार मनपा91910530
रायगड632520
पनवेल मनपा51321
नाशिक (शहर +ग्रामीण)42129
मालेगाव मनपा76158
अहमदनगर (शहर+ग्रामीण)120366
धुळे14516
जळगाव 696172
नंदूरबार 353
सोलापूर9334170
सातारा527316
कोल्हापूर 50924
सांगली112291
सिंधुदुर्ग3320
रत्नागिरी26425
औरंगाबाद15431468
जालना1291
हिंगोली 19010
परभणी631
लातूर 12583
उस्मानाबाद 7631
बीड471
नांदेड 1236
अकोला 6031428
अमरावती 23216
यवतमाळ 130221
बुलडाणा 6383
वाशिम 80
नागपूर5928411
वर्धा 901
भंडारा3200
गोंदिया 6610
चंद्रपूर2610
गडचिरोली3600
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)60015
एकूण70013301082362
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *