कोरोनाबाधित महिलेला पाच दिवसात डिस्चार्ज, पुण्यातील नामांकित खासगी रुग्णालयाचा धक्कादायक प्रकार

कोरोनाबाधित महिलेला पुण्यातील एका प्रतिष्ठित खासगी (Pune Corona Update) रुग्णालयाने अवघ्या पाच दिवसात डिस्चार्ज दिला.

कोरोनाबाधित महिलेला पाच दिवसात डिस्चार्ज, पुण्यातील नामांकित खासगी रुग्णालयाचा धक्कादायक प्रकार

पुणे : कोरोनाबाधित महिलेला पुण्यातील एका प्रतिष्ठित खासगी (Pune Corona Update) रुग्णालयाने अवघ्या पाच दिवसात डिस्चार्ज दिला. ही महिला खेड तालुक्यातील राक्षेवाडी या परिसरात वास्तव्यास आहे. विशेष म्हणजे महिलेला एका खासगी वाहनाने घरी सोडण्यात आलं. त्यानंतर ही महिला अवघ्या पाच दिवसात उपचार घेऊन बरी होऊन घरी आली ही माहिती वाऱ्यासारखी तालुकाभर पसरली. अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने हस्तक्षेप केल्यावर या रुग्णालयाने या महिलेला पुन्हा रुग्णालयात दाखल केलं (Pune Corona Update) .

महिलेच्या पतीला कोरोनाची लागण झाली होती. पतीमुळे या महिलेसह कुटुंबातील इतर पाच जणांना कोरोनाची लागण झाली. या महिलेचा रिपोर्ट 16 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे तिला उपचारासाठी पुण्यातील एका नामांकित खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या रुग्णालयाने महिलेवर पाच दिवस उपचार करुन पाचव्या दिवशी रात्री एका खासगी वाहनाद्वारे घरी सोडलं.

महिलेला पाच दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यामुळे परिसरात एकच चर्चा सुरु झाली. अखेर स्थानिक लोकप्रतिनिधींनी यावर आक्षेप घेत जिल्हा परिषदे मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने रुग्णालयाला खुलासा करण्यास बजावलं. अखेर तक्रारी आणि चौकशीनंतर रुग्णालय प्रशासनाने महिलेला पुन्हा रुग्णालयात दाखल केलं.

पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5 हजार पार

दरम्यान, पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5 हजाराच्या पार गेला आहे. पुणे जिल्ह्यात काल (22 मे) दिवसभरात सर्वाधिक 358 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5 हजार 167 वर पोहोचला. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 257 रुग्णांचा बळी गेला आहे. पुण्यात आतापर्यंत 2 हजार 371 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

Corona | देशात कोरोनाबाधितांची रेकॉर्डब्रेक वाढ, 24 तासात 6 हजारांहून अधिक नवे रुग्ण

Corona Effect | देशातील आर्थिक विकास दर शून्याखाली जाण्याचा अंदाज, अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *