राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांविषयी अश्लील कमेंट्स, पुण्यात सहा जणांवर गुन्हा

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या फेसबुक पोस्टवर सहा जण वारंवार अश्लील कमेंट्स करत होते, त्यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Pune Facebook users booked for vulgar comments on Rupali Chakankar social media post)

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांविषयी अश्लील कमेंट्स, पुण्यात सहा जणांवर गुन्हा
Follow us
| Updated on: Apr 22, 2020 | 4:29 PM

पुणे : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविषयी सोशल मीडियावर अश्लील कमेंट्स करणं टवाळखोरांना चांगलंच महागात पडलं आहे. पुण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune NCP Leader Rupali Chakankar social media post)

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या फेसबुक पोस्टवर सहा जण वारंवार अश्लील कमेंट्स करत होते. चाकणकर यांनी ट्विटरवर काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी ट्वीट केलं होतं. या टीकेचा राग मनात धरुन सहा जण रुपाली चाकणकर यांच्या फेसबुक पोस्टवर अश्लील शेरेबाजी करत असल्याचा आरोप आहे.

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात हा प्रकार घडला असून तक्रारीनंतर पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कलम 354 अ आणि ड अंतर्गत विनयभंग आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचा : आम्ही हिरोईन आहोतच, पण…, रुपाली चाकणकर यांचा लोणीकरांना इशारा

‘कोरोना’च्या संकटकाळात प्रत्येक जण आपापल्या परीने एकमेकांची मदत करत आहे. रुपाली चाकणकर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मदतीची माहिती ट्विटरवर देत आहेत. मात्र काहीच दिवसांपूर्वी चाकणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुजाभाव केल्याचे ट्वीट केले होते.

केंद्राकडे साडेतीन लाख पीपीई किट्स आणि आठ लाख N-95 मास्कची मागणी केली असताना, महाराष्ट्राला फक्त 30 हजार पीपीई किट्स आणि एक लाख N-95 मास्क पाठवल्याने चाकणकर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. महाराष्ट्राच्या जीवाशी खेळू नका असा इशाराही त्यांनी दिला होता.

(Pune NCP Leader Rupali Chakankar social media post)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.