चिकनचे दर वाढले, मटणही सातशेपार, पुणे-कोल्हापुरात सोशल डिस्टन्स राखून खरेदी

सोशल डिस्टन्स राखून मांसाहारप्रेमी रांगेत उभे राहिले, मात्र जिभेचे चोचले पुरवण्यापासून खवय्ये स्वतःला रोखू शकलेले दिसत नाहीत. (Pune Chicken Shops rush during lockdown)

चिकनचे दर वाढले, मटणही सातशेपार, पुणे-कोल्हापुरात सोशल डिस्टन्स राखून खरेदी

पुणे : राज्य सरकारने मांसाहार विक्रेत्यांना परवानगी दिल्यामुळे रविवारी खवय्यांनी चिकन-मटण खरेदीसाठी गर्दी केली. ग्राहकांची गर्दी वाढल्याने चिकन आणि मटणाच्या दरातही चांगलीच वाढ झाली. मटणाच्या दरांनी तर सातशेचा आकडा गाठला. (Pune Chicken Shops rush during lockdown)

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी ठराविक अंतर ठेऊन रांग लावावी, असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्स राखून मांसाहारप्रेमी रांगेत उभे राहिले, मात्र जिभेचे चोचले पुरवण्यापासून खवय्ये स्वतःला रोखू शकलेले दिसत नाहीत.

ग्राहकांची गर्दी वाढल्याने चिकन आणि मटणाच्या दरातही चांगलीच वाढ झाली. पुण्यात काही दुकानांत मटणाचा दर सातशे रुपये किलोवर गेला. गेल्या काही दिवसात मटणाचा दर सहाशे रुपयावर होता. म्हणजेच मटणाच्या दरात किलोमागे शंभर रुपयांची वाढ झाली.

हेही वाचा : राजनेही मला फोन करुन सूचना दिल्या, त्याबद्दल धन्यवाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका पोल्ट्री उद्योगाला बसला होता. अनेक ठिकाणी शंभर रुपयांच्या खाली चिकनचे दर घसरले होते. मात्र आता चिकनलाही भाव आला आहे‌. चिकनचे दर दोनशे रुपये किलोवर पोहोचले आहेत. म्हणजेच चिकनच्या दरांमध्येही किलोमागे साठ ते शंभर रुपयांनी वाढ झाली.

मांसाहार खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विक्रेते आणि ग्राहक काळजी घेत असल्याचं पाहायला मिळालं. सोशल डिस्टन्स मेंटेन करुन नागरिक रांगेत उभे होते. त्याचबरोबर पोलिसही नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करत होते.

हेही वाचा :  मी श्रीमंत नाही, पण गरजूंना अर्धी भाकर देण्याची दानत, नाशिकच्या शेतकऱ्याचं शिवार खुलं

कोल्हापुरातही संचारबंदीत चिकन-मटणच्या दुकानासमोर खवय्यांच्या रांगा लागल्या. इथेही सोशल डिस्टन्स पाळत खवय्ये मांस खरेदी करत होते. चिकन व्यावसायिकांकडूनही खबरदारी घेतली जात आहे. ग्राहकांच्या हातावर सॅनिटायझर दिल जात आहे. चिकनचे दर कोल्हापुरात 150 ते 180 रुपयापर्यंत वाढले आहेत.

(Pune Chicken Shops rush during lockdown)

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई384423741227
पुणे (शहर+ग्रामीण)6507938294
पिंपरी चिंचवड मनपा389347
ठाणे (शहर+ग्रामीण)
41863684
नवी मुंबई मनपा26178052
कल्याण डोंबिवली मनपा12409121
उल्हासनगर मनपा3136
भिवंडी निजामपूर मनपा120116
मिरा भाईंदर मनपा64715713
पालघर 14113
वसई विरार मनपा82710527
रायगड574518
पनवेल मनपा46821
नाशिक (शहर +ग्रामीण)36428
मालेगाव मनपा74752
अहमदनगर (शहर+ग्रामीण)108366
धुळे14016
जळगाव 610172
नंदूरबार 343
सोलापूर8724168
सातारा490316
कोल्हापूर 42924
सांगली112291
सिंधुदुर्ग3320
रत्नागिरी24225
औरंगाबाद14621465
जालना1190
हिंगोली 14910
परभणी571
लातूर 11883
उस्मानाबाद 6630
बीड460
नांदेड 1086
अकोला 5711428
अमरावती 21316
यवतमाळ 130220
बुलडाणा 5883
वाशिम 80
नागपूर5568410
वर्धा 1101
भंडारा2900
गोंदिया 6110
चंद्रपूर25‬10
गडचिरोली3200
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)59013
एकूण65168280812197

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *