Lockdown : अखेर ऊसतोड कामगार त्यांच्या गावी रवाना होणार!

ऊसतोड मजूर आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला. आजपासून हे ऊसतोड कामगार त्यांच्या गावाकडे रवाना होणार आहेत.

Lockdown : अखेर ऊसतोड कामगार त्यांच्या गावी रवाना होणार!
Follow us
| Updated on: Apr 20, 2020 | 8:25 AM

पुणे : ऊसतोड मजूर आणि त्यांच्या (Migrant Workers) कुटुंबियांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी ऊसतोड मजुरांना आवश्यक तपासण्या करुन त्यांच्या स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा केला. त्यानंतर आजपासून हे ऊसतोड (Migrant Workers) कामगार त्यांच्या गावाकडे रवाना होणार आहेत.

कुठे किती ऊसतोड कामगार?

पुणे विभागात तब्बल 1 लाख 18 हजार 209 ऊसतोड कामगार आहेत. यापैकी 77 हजार 158 ऊसतोड कामगार गावी रवाना होतील. तर 40 हजार 951 कामगार हे ऊसतोडणी करतील. पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 32 कारखान्यातील कामगार हे वैद्यकीय तपासणी करुन वाहनांमधून त्यांच्या गावी रवाना होणार आहेत.

पुणे जिल्ह्यात सात कारखान्यात 36 हजार 950 ऊसतोड कामगार आहेत. यापैकी 14 हजार 874 कामगार आपल्या गावी जाणार आहेत. तर बारामती परिसरातील तीन कारखान्यात 22 हजार 76 ऊसतोड कामगारांची ऊसतोडणी सुरु राहील.
कोल्हापूर जिल्ह्यात सात सहकारी साखर कारखान्यातील 16 हजार 261 कामगार आपल्या गावी जाणार आहेत. सांगली जिल्ह्यात दहा साखर कारखाने असून 31 हजार 31 कामगार आहेत. यापैकी नऊ कारखान्यांतील 28 हजार 123 कामगार गावी रवाना होणार तर 2908 कामगार ऊस तोडणार आहेत.
तर सातारा जिल्ह्यात आठ साखर कारखाने असून 33 हजार 867 ऊसतोड कामगार आहेत. यापैकी पाच साखर कारखान्यात 17 हजार 900 कामगार घरी जातील. तर दोन कारखान्यातील 15 हजार 967 ऊस तोड कामगार ऊस तोडणी सुरु ठेवणार आहेत.
पुणे
चार साखर कारखान्यातील कामगार घरी जाणार
1) राजगड सहकारी साखर कारखाना – 300
2) संत तुकाराम सहकारी साखर कारखाना – 4024
3) छत्रपती सहकारी साखर कारखाना – 3000
4) भीमाशंकर सहकारी साखर कारखाना – 7550
चार कारखान्यातील 14,874 ऊस तोड कामगार गावी जाणार
बारामती परिसरातील तीन कारखान्यात 22 हजार 76 ऊसतोड कामगारांची ऊसतोडणी सुरू
1) सोमेश्वर सहकारी साखर कारखाना 7217 ऊस तोडणी सुरु
2) माळेगाव सहकारी साखर कारखाना 9323 ऊसतोड सुरु
3) विघ्नहर सहकारी साखर कारखाना 5536 ऊस तोडणी सुरु,
कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात सात सहकारी साखर कारखान्यातील 16 हजार 261 कामगार आपल्या गावी जाणार
1) कोल्हापूर दत्त सहकारी साखर कारखाना –  4856,
 2) जवाहर सहकारी साखर कारखाना – 5284,
3) शरद सहकारी साखर कारखाना – 1078
4) पंचगंगा सहकारी साखर कारखाना – 50
 5) दूध गंगा सहकारी साखर कारखाना – 60
6) गुरुदत्त सहकारी साखर कारखाना – 4777
 7) दालमिया शुगर  साखर कारखाना – 156
सांगली
सांगली जिल्ह्यात दहा साखर कारखाने असून 31 हजार 31 कामगार आहेत. यापैकी नऊ कारखान्यांतील 28 हजार 123 कामगार गावी रवाना होणार तर 2908 कामगार ऊस तोडणार
1) राजारामबापू सहकारी साखर कारखाना – 6856
2) डॉक्टर पतंगराव कदम सहकारी साखर कारखाना – 9237
3) विश्वास सहकारी साखर कारखाना – 40
4) पंचगंगा सहकारी साखर कारखाना – 122,
5) उदगिरी शुगर – 2255
6) दत्त इंडिया – 2077,
7) श्री शंकर लिमिटेड – 129
8) दालमिया शुगर लिमिटेड – 145
9) डॉक्टर जी डी बापू लाड 7362 ऊसतोड सुरु
तर हुतात्मा सहकारी साखर कारखाना 2908 ऊसतोड सुरु
सातारा
सातारा जिल्ह्यात आठ साखर कारखाने असून 33 हजार 867 ऊसतोड कामगार आहेत. यापैकी पाच साखर कारखान्यात 17 हजार 900 कामगार घरी जातील. तर
1) कृष्णा सहकारी साखर कारखाना – 3296,
2) लोकनेते देसाई सहकारी साखर कारखाना – 1421
3) श्रीराम सहकारी साखर कारखाना – 3560,
 4) किसन वीर सहकारी साखर कारखाना – 2111
 5) जयवंत शुगर लिमिटेड – 6128
6) जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना – 1384
तर दोन साखर कारखान्याची ऊस तोडणी सुरु राहणार आहे. 15 हजार 967 ऊस तोड कामगार ऊस तोडणी सुरु ठेवणार आहेत.
1) अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना  4477 ऊसतोड सुरु
2) सह्याद्री सहकारी साखर कारखाना 11,490 ऊसतोड सुरु

धनंजय मुंडे यांचा निर्णय

ऊस हंगाम संपला असला तरी लॉकडाऊनमुळे या कामगारांना घरी जाता आलं नाही. मात्र, पावसामुळे हाल होतं असल्यानं आम्हाला घरी न्या, अशी मागणी या कामगारांनी धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. यानंतर धनंजय मुंडे यांनी ऊसतोड मजुरांना आवश्यक तपासण्या करुन त्यांच्या स्वगृही परतण्याचा (Migrant Workers) मार्ग मोकळा केला आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.

पंकजा मुंडेंचं आवाहन

दरम्यान, याप्रकरणी ऊसतोड कामगारांसाठी भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankja Munde) आक्रमक पावित्रा घेतला होता. पावसात कामगारांचे हाल होत आहेत. लवकरात लवकर त्यांची घरी जाण्याची सोय करा, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं होतं.

कोल्हापुरातील ऊसतोड मजुरांची मागणी

कोल्हापूरातील शिरोळमध्ये झालेल्या वादळी पावसाने दत्त सहकारी साखर कारखाना परिसरात राहणाऱ्या मजुरांच्या 500 हून अधिक झोपड्या जमीनदोस्त झाल्या. उरलं-सुरलं धान्य भिजले तसेच अन्नात पाणी साचले. अंथरुण पांघरुन भिजले.

पालाची काठी डोक्यात पडल्यानं एक महिला ही किरकोळ जखमी झाली. पाऊस गेल्यानंतर काही क्षणात हजारो ऊसतोड मजुरांनी एकत्र येत गोंधळ सुरू केला. ऊस हंगाम संपला असला मात्र लॉकडाऊनमुळे या कामगारांना घरी जाता आलं नाही. त्यातचं आता पावसामुळं हाल होतं असल्यानं आम्हाला घरी न्या, अशी मागणी या कामगारांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे (Migrant Workers) केली होती.

संबंधित बातम्या :

जळगावात फेसबुक लाईव्हवर लग्न, नवदाम्पत्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 25 हजार

दत्ता, तुम्हा सर्वांच्या भरवश्यावर करतोय, तुम्ही काळजी घ्या, पुण्यातील सरपंचाला थेट उद्धव ठाकरेंचा कॉल

नागपुरातील ‘त्या’ कोरोनाग्रस्त मृताच्या संपर्कातील 37 जण पॉझिटिव्ह

धक्कादायक! क्वारंटाईनसाठी दिलेल्या शिक्क्यांची शाई निकृष्ट, पाण्याने धुवून लोक घराबाहेर

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.