पुण्यात कामगारांसाठी 214 शेल्टर होम, खाण्या-पिण्यासह वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी

बाहेर पडलेल्या कामगारांसह बेघर नागरिकांसाठी पुणे विभागात 214 निवारागृहे (शेल्टर होम) सुरु करण्यात आली (Pune Shelter Home For Workers)  आहेत.

पुण्यात कामगारांसाठी 214 शेल्टर होम, खाण्या-पिण्यासह वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी
Follow us
| Updated on: Mar 30, 2020 | 8:27 PM

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन (Pune Shelter Home For Workers)  करण्यात आले आहे. त्यामुळे बाहेर पडलेल्या कामगारांसह बेघर नागरिकांसाठी पुणे विभागात 214 निवारागृहे (शेल्टर होम) सुरु करण्यात आली आहेत. या निवारागृहात 64 हजार 926 नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी याबाबतची माहिती दिली.

लॉकडाऊनच्या कालावधीत बेघर झालेले नागरिक, विस्थापित तसेच परराज्यातील (Pune Shelter Home For Workers)  अनेक कामगार अडकले आहेत. त्यांच्यासाठी निवारागृह, अन्नधान्य आणि भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या वतीने अडकलेल्यांसाठी तसेच बेघर नागरिकांसाठी निवारागृहे सुरू करण्यात आली आहेत.

पुणे विभागातील पुणे जिल्ह्यात 42 निवारागृहे ( 12 हजार 460 नागरिक), सातारा जिल्ह्यात 143 निवारागृहे (4 हजार 688 नागरिक), सांगली जिल्ह्यात 16 निवारागृहे (1 हजार 306 नागरिक), सोलापूर जिल्ह्यात 2 निवारागृहे,(62 नागरिक) कोल्हापूर जिल्ह्यात 11 निवारागृहे ( 46 हजार 410 नागरिक) एकूण 64 हजार 926 विस्थापित कामगार व बेघरांची व्यवस्था पुणे विभागात करण्यात आली आहे.

बेघर तसेच विस्थापित कामगारांसाठी निवारागृहात अन्नधान्य, भोजन, पाणी, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती डॉ.म्हैसेकर यांनी दिली.

जमावबंदी व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कामगार व नागरिकांनी आहे त्याच ठिकाणी थांबून जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या निवारागृहात रहावे, आपल्या गावी अथवा परराज्यात जाण्यासाठी प्रवास करू नये, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केले (Pune Shelter Home For Workers)  आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.