पुणेकरांची चिंता वाढली, चोवीस तासात तिसरा ‘कोरोना’ बळी

राज्यातील ‘कोरोना’बळींची संख्या 35 वर पोहोचली आहे. पुणे विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 104 वर गेली आहे. (Pune Three Corona Patients Died in a day)

पुणेकरांची चिंता वाढली, चोवीस तासात तिसरा 'कोरोना' बळी
Follow us
| Updated on: Apr 05, 2020 | 2:39 PM

पुणे : पुणेकरांची चिंता वाढवणाऱ्या बातम्या पुण्यातून येत आहेत. गेल्या चोवीस तासात पुण्यात तिसऱ्या ‘कोरोना’ग्रस्त रुग्णाचा बळी गेला. औंध येथील जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील ‘कोरोना’बळींची संख्या 35 वर पोहोचली आहे. (Pune Three Corona Patients Died in a day)

संबंधित 69 वर्षीय महिलेची नुकतीच शस्त्रक्रिया झालेली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर तिच्यावर औंध येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज तिची प्राणज्योत मालवली.

गेल्या 24 तासात पुण्यात गेलेला हा तिसरा बळी आहे. पुण्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या ‘कोरोना’ग्रस्तांची संख्या पाचवर पोहोचली आहे.  आतापर्यंत ‘कोरोना’मुळे मृत्यू झालेल्या पुण्यातील चार जणांनी परदेश प्रवास केलेला नव्हता. पाचव्या महिलेविषयी अद्याप तपशील मिळालेला नाही.

महाराष्ट्रातील ‘कोरोना’ बाधित रुग्णांचा आकडा 661 वर गेला आहे. तर राज्यातील ‘कोरोना’बळींची संख्या 35 वर पोहोचली आहे. पुणे विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 104 वर गेली आहे.

चौघे पुणेकर परदेश प्रवास न केलेले

ससून रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्या (5 एप्रिल) 48 वर्षीय ‘कोरोना’ग्रस्त व्यक्तीने परदेशी प्रवास केलेला नाही. ‘कोरोना’ रिपोर्ट निगेटिव्ह असल्याने डिस्चार्ज मिळालेल्या 60 वर्षीय महिलेनेही (5 एप्रिल) परदेशात प्रवास केलेला नव्हता. पुण्यात याआधी (2 एप्रिल) एका 50 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्या महिलेनेही कोणताही परदेशी प्रवास केला नव्हता. तर 30 मार्चलाही पुण्यात मृत्यू झाला, त्या 52 वर्षीय ‘कोरोना’ग्रस्त व्यक्तीचीही परदेशवारी झालेली नाही. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता आहे.

‘त्या’ महिलेचं नेमकं काय झालं?

पुण्यातील 60 वर्षीय महिला तीन दिवसांपूर्वी नायडू रुग्णालयात दाखल झाली होती. यावेळी ती ‘कोरोना’ निगेटिव्ह असल्याने तिला डिस्चार्ज दिला होता. मात्र घरी गेल्यानंतर इंक्युबेशन पिरेडमध्ये असताना अचानक तिची तब्येत ढासळली. काल तिला ससून रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यासाठी नेलं जात होतं, मात्र तोपर्यंत महिलेचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर सॅम्पल चेक केले असता, ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली.

(Pune Three Corona Patients Died in a day)

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

1. मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च 2. मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च *मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)* 3. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च 4. मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च 5. नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च 6. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च 7. बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च 8. मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च 9. पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च 10. मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च 11. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 31 मार्च 12. पालघर  – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल 13. मुंबई – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल 14. मुंबई – 84 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल 15. मुंबई – 73 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल 16. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल 17. मुंबई – 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल 18. जळगाव – एका रुग्णाचा मृत्यू – 2 एप्रिल 19. मुंबई – 61 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल 20. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल 21. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल 22. मुंबई – 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल 23. पुणे – 50 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल 24. वसई – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल 25. बदलापूर – एका रुग्णाचा मृत्यू – 3 एप्रिल 26. मुंबई – 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 3 एप्रिल 27. अमरावती – एका रुग्णाचा मृत्यू – 4 एप्रिल 28. मुंबई – 70 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल 29. मुंबई – 53 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल 30. मुंबई – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल 31. मुंबई – 47 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 4 एप्रिल 32. मुंब्रा – 57 वर्षीय पुरुषाचा मृत्यू -= 4 एप्रिल 33. पुणे – 60 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल 34. पुणे – 48 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 5 एप्रिल 35. पुणे – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल

ताजी आकडेवारी इथे पहा :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

(Pune Three Corona Patients Died in a day)

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.