किमान 12 तास रस्तेमार्गे प्रवास, अशोक चव्हाणांवर मुंबईत कोरोनावर उपचार!

काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan corona positive) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.

किमान 12 तास रस्तेमार्गे प्रवास, अशोक चव्हाणांवर मुंबईत कोरोनावर उपचार!
Follow us
| Updated on: May 25, 2020 | 1:29 PM

नांदेड : महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची बाधा झाली आहे. काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan corona positive) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यापूर्वी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनावर मात करुन, ते घरी परतले आहेत.

दरम्यान, अशोक चव्हाण हे मुंबईतून नांदेडला गेले होते. तिथे त्यांनी स्वत:हून कोरोना चाचणी केली. काल ही चाचणी पॉझिटिव्ह आली. (Ashok Chavan corona positive)

अशोक चव्हाण हे लॉकडाऊनच्या काळात दोन महिने नांदेडमध्येच होते. मात्र मध्यंतरी विधानपरिषद निवडणुकीसाठी ते मुंबईला गेले होते. या निवडणुकीनंतर ते पुन्हा नांदेडला परतले. नांदेडला येऊन ते स्वत: होम क्वारंटाईन झाले होते. त्यांनी कुटुंबापासून स्वत:ला वेगळं ठेवलं होतं. नांदेडमधील रुग्णालयात त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या रिपोर्टनंतर अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्येच उपचार घेतले. त्यानंतर आज ते उपचारासाठी नांदेडहून मुंबईकडे रवाना झाले आहेत.

मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत. नांदेड-मुंबई हा प्रवास ते बाय रोड अर्थार रस्तेमार्गे करत आहेत. या प्रवासासाठी किमान 12 तास अपेक्षित आहेत. तो प्रवास करुन, अशोक चव्हाण मुंबईत पोहोचतील. त्यानंतर मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जातील.

दरम्यान अशोक चव्हाण यांची प्रकृती स्थिर आहे. मुंबईकडे रवाना होताना, त्यांनी उपस्थितांना हात दाखवून आपण ठिक असल्याचं सांगितलं.

(Ashok Chavan corona positive)

संबंधित बातम्या

 लॉकडाऊनमुळे पहिल्यांदाच इतके दिवस नांदेडमध्ये, मंत्री अशोक चव्हाण सध्या काय करतात?

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.