सचिवांनी कोणत्या बड्या नेत्याच्या सांगण्यावरुन वाधवान यांना सहलीसाठी पत्र दिलं? : राधाकृष्ण विखे पाटील

"सचिवांनी कोणत्या बड्या नेत्याच्या सांगण्यावरुन वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरच्या सहलीसाठी पत्र दिलं हे सत्य जनतेसमोर यायला हवं", अशी मागणी भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे (Radhakrishna Vikhe Patil on Wadhwan case).

सचिवांनी कोणत्या बड्या नेत्याच्या सांगण्यावरुन वाधवान यांना सहलीसाठी पत्र दिलं? : राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर : “आर्थिक घोटाळ्यातील आरोपी वाधवान कुटूंबाला महाबळेश्वरला जाण्याची परवानगी सचिव देणार नाही. त्यांनी कोणत्या बड्या नेत्याच्या सांगण्यावरुन पत्र दिले हे सत्य जनतेसमोर यायला हवं”, अशी मागणी भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे (Radhakrishna Vikhe Patil on Wadhwan case). जनतेला दिलासा देण्यापेक्षा काही मंत्री स्वतःची पाठ थोपटून घेत असल्याची टिकाही यावेळी राधाकृष्ण विखे पाटलांनी केली.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “आर्थिक घोटाळ्यातील आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना पत्र देणाऱ्या सचिवांना सक्तीच्या रजेवर पाठवून सरकार काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. हा लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार आहे. आर्थिक घोटाळ्यातील आरोपी वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाण्यासाठी सचिव परवानगी देणार नाहीत. त्यांनी कोणत्या बड्या नेत्याच्या सांगण्यावरुन हे पत्र दिले? हे सत्य जनतेसमोर यायला हवं.”

सामान्य माणसाला घराबाहेर पडायला परवानगी नसताना श्रीमंताच्या सहलीला थेट पास मिळतो आहे, अशी परिस्थिती आहे. अशी परवानगी देण्याचं धाडस सचिवात नाही. या प्रकरणाचं सत्य काय आहे हे जनतेसमोर यावं, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. त्यामुळे हा मुद्दा आणखी पेटण्याची शक्यता आहे.

“फक्त प्रसार माध्यमांसमोर येवून पाठ थोपटून घेवू नका”

राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. ते म्हणाले, “देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना मुठभर मंडळ मात्र श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे. महामारीत जनतेला दिलासा देण्याची गरज असून कोरोनाचं संकट श्रेयवादाची लढाई नाही. जिल्ह्याची जबाबदारी असणारे मंत्रीही मुंबईत तळ ठोकून बसले आहेत. त्यांनी केवळ प्रसार माध्यमांसमोर येवून पाठ थोपटून घेवू नये. अपयश आलं तर त्याचा धनी कोण असणार?”

कोरोनाची अद्ययावत आकडेवारी :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई384423741227
पुणे (शहर+ग्रामीण)6507938294
पिंपरी चिंचवड मनपा389347
ठाणे (शहर+ग्रामीण)
41863684
नवी मुंबई मनपा26178052
कल्याण डोंबिवली मनपा12409121
उल्हासनगर मनपा3136
भिवंडी निजामपूर मनपा120116
मिरा भाईंदर मनपा64715713
पालघर 14113
वसई विरार मनपा82710527
रायगड574518
पनवेल मनपा46821
नाशिक (शहर +ग्रामीण)36428
मालेगाव मनपा74752
अहमदनगर (शहर+ग्रामीण)108366
धुळे14016
जळगाव 610172
नंदूरबार 343
सोलापूर8724168
सातारा490316
कोल्हापूर 42924
सांगली112291
सिंधुदुर्ग3320
रत्नागिरी24225
औरंगाबाद14621465
जालना1190
हिंगोली 14910
परभणी571
लातूर 11883
उस्मानाबाद 6630
बीड460
नांदेड 1086
अकोला 5711428
अमरावती 21316
यवतमाळ 130220
बुलडाणा 5883
वाशिम 80
नागपूर5568410
वर्धा 1101
भंडारा2900
गोंदिया 6110
चंद्रपूर25‬10
गडचिरोली3200
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)59013
एकूण65168280812197

संबंधित बातम्या :

देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या मुंबईची स्थिती काय? प्रत्येक हॉटस्पॉटची संपूर्ण माहिती

नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावती येथे कोरोना चाचण्यांची सुविधा करा, आरोग्यमंत्र्यांची केंद्र शासनाकडे मागणी

दोन परिचारिकांना ‘कोरोना’, दादरचे शुश्रुषा रुग्णालय सील करण्याचे मुंबई महापालिकेचे आदेश

दादरमध्ये ‘कोरोना’चे तीन नवे रुग्ण, दोन नर्सना लागण, धारावीत आणखी पाच कोरोनाग्रस्त सापडले

लॉकडाऊनमध्ये वाधवान कुटुंबाला पर्यटनासाठी मेहरबानी, प्रधान सचिवांना सक्तीची रजा, गृहमंत्र्यांची कारवाई

Radhakrishna Vikhe Patil on Wadhwan case

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *